सहाय्यक कक्ष अधिकारी परीक्षेची तयारी कशी कराल ?

By Admin | Published: July 30, 2016 07:43 PM2016-07-30T19:43:50+5:302016-07-30T19:43:50+5:30

३१ जुलै रोजी सहाय्यक कक्ष अधिकारी पदाची पूर्व परीक्षा होणार आहे, त्यासाठी हे थोडक्यात पण महत्वाचे मुद्दे देण्याचा छोटासा प्रयत्न

How will Assistant Room Officer prepare for the exam? | सहाय्यक कक्ष अधिकारी परीक्षेची तयारी कशी कराल ?

सहाय्यक कक्ष अधिकारी परीक्षेची तयारी कशी कराल ?

googlenewsNext
>प्रा. जॉर्ज क्रूझ -
कोल्हापूर, दि. 30 - STT परीक्षा १९ जूनला पार पडली. ही प्रश्नपत्रिका पाहून अभ्यास कोणता करावा?  कसा करावा? काय वाचावे? असे अनेक प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीत. ३१ जुलै रोजी सहाय्यक कक्ष अधिकारी पदाची पूर्व परीक्षा होणार आहे. यासाठी तुम्ही तयारी केली असेलच. शेवटच्या टप्प्यात काय करावे व कसे नियोजन करावे असे अनेक प्रश्न विद्यार्थी वर्गाकडून वारंवार विचारण्यात येतात. त्यासाठी हे थोडक्यात पण महत्वाचे मुद्दे देण्याचा छोटासा प्रयत्न.
 
सर्व प्रथम परीक्षा पध्दती समजून घ्या. १०० प्रश्न, १०० गुण व वेळ/तास १/४  निगेटिव्ह पध्दत आहे. यावेळी ४३ जागा असल्यामुळे मेरीट ५० ते ५५ च्या दरम्यान लागू शकते. त्यामुळे तुमची तयारी त्यापध्दतीने हवी. पहिल्यांदा अभ्यासक्रमाची वर्गवारी करा एकूण  ७  घटक आहेत त्याचे विश्लेषण करा. ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ असे तीन टप्पे करा.
 
‘अ‘ मध्ये पैकीच्या पैकी गुण देणारे घटक आहेत. त्यामुळे हा घटक पक्का करा.
१) चालू घडामोडी- एकूण १५ प्रश्न असतात हा घटक खूप महत्वाचा आहे यासाठी मागील वर्षभराच्या पृथ्वी परिक्रमा किंवा राजपथ टाईम्स तसेच अभिनव प्रकाशनाचे चालू घडामोडी हे पुस्तक जरुर अभ्यासा.
 
२) गणित व बुध्दीमापन- शक्या असल्यास आर एस अग्रवाल यांची Quantitive Aptirude आणि Verbal-Non Verbal Reasning ही पुस्तके चाळा. मराठी माध्यमासाठी गणितला वा. ना. दांडेकर तसेच बुध्दीमापनसाठी अभिनव प्रकाशनचे पुस्तक वापरा. या घटकावरती १५ पैकी १२ गुण घेता आले पाहीजे.
 
३) विज्ञान- या घटकासाठी ८ ते १२ वी पुस्तके व मोहन आपटे यांची अणुशक्ती, अवकाश व तंत्रज्ञान हे घटक जरूर वाचा. सरावासाठी अक्षरगंगा प्रकाशनाचे सराव विज्ञान घटक हे पुस्तक सोडवा. या घटकावरती १५ प्रश्न विचारतात किमान १० गुण घेणे आवश्यक ठरेल.
 
‘ब’ घटक- 
भूगोल- यामध्ये प्रामुख्याने कला शाखा घटकातील भूगोल व राज्यशास्त्र या दोन विषयांचा समावेश असेल. यामध्ये भूगोल विषयाचा अभ्यास नियोजन पूर्वक केल्यास १५ पैकी १५ गुण घेता येतात. यासाठी महाराष्ट्राचा भूगोल-प्रा. सवदी व प्रा. खतीब सराचे पुस्तक करा तसेच सरावासाठी इंदूमती प्रकाशनाचे भूगोलाचे पुस्तक चाळा.
 
राज्यशास्त्र- या घटकावरती १० प्रश्न विचारतात यामध्ये किमान ६ गुण तरी पडायला हवेत. पैकीच्या पैकी घेवू शकता यासाठी रंजन कोळंदे सरांचे भारताची राज्यघटना तसेच प्रा. खंदारे सराचे भारतीय राज्यघटना ही पुस्तके चाळा व कल्पवृक्ष प्रकाशनाचे १८०० सराव प्रश्नसंच सोडवा.
 
‘क’ घटक- 
हा घटक म्हणजे अलिबाबाची गुहा आहे. या घटकांचा आवाका भरपूर आहे व सामग्रीही भरपूर आहे. यामधे इतिहास व अर्थशास्त्र या दोन घटकांचा समावेश असतो. एकूण ३० प्रश्न विचारतात.
 
इतिहास- ८, ११ वी, सातभाई, गाठाळ व कोळंबे सरांची इतिहासावरची पुस्तके वाचा. सर्वांना येणारे प्रश्न तुम्हाला आले पाहीजेत. अनोळखी प्रश्नाचा तणाव तुम्ही घेवू नका ते सर्वांनाच येणार नाहीत काही अपवाद सोडलेतर. इतिहासाला कमीत कमी १५ पैकी ७ गुण हवेत.
 
अर्थशास्त्र- ११ वी, १२ वी, रंजन कोळंबे व देसले सरांचे अर्थशास्त्र हे पुस्तक पुरेसे आहे. या घटकावरती १५ प्रश्न विचारतात त्यापैकी ७ ते ८ प्रश्नाची उत्तरे तुम्हास येणे अपेक्षित आहे.
प्रश्नपत्रिका कशी सोडवाल-
 
सर्व प्रथम तुम्हाला येणारे प्रश्न सोडवायला घ्या. ज्या घटकावरती तुमची कमांड आहे तो घटक सोडवत चला. जे प्रश्न अनोळखी आहेत ते सोडून द्या. जे प्रश्न संभ्रमावस्थेत आहेत त्याचे पर्याय कट करा व योग्य उत्तर निवडा. सर्वसाधारणपणे ७० ते ८० प्रश्न सोडवण्याची तयारी करा. जे बरोबर असतील असे ६० ते ६५ पर्यंत असू द्यात.
अधिकाधिक प्रश्नाचा सराव करा. गोंधळून जावू नका. आयोग तुमची निवड करण्यासाठी बसले आहे, त्यांना ४३ उमेदवार हवे आहेत ते तुम्ही असू शकता. सकारात्मक रहा.
 

Web Title: How will Assistant Room Officer prepare for the exam?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.