एच.पी. पाटील यांना पीएच.डी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:28 AM2021-07-07T04:28:38+5:302021-07-07T04:28:38+5:30

फोटो (०५०७२०२१-कोल-एच. पी. पाटील (पीएच.डी.) दहावीच्या मूल्यमापनाबाबत शाळांना आवाहन कोल्हापूर : दहावी परीक्षेच्या सुधारित मूल्यमापनाअंतर्गत राज्य माध्यमिक ...

H.P. Patil has a Ph.D. | एच.पी. पाटील यांना पीएच.डी.

एच.पी. पाटील यांना पीएच.डी.

Next

फोटो (०५०७२०२१-कोल-एच. पी. पाटील (पीएच.डी.)

दहावीच्या मूल्यमापनाबाबत शाळांना आवाहन

कोल्हापूर : दहावी परीक्षेच्या सुधारित मूल्यमापनाअंतर्गत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थीनिहाय गुण नोंदणीसाठी संगणकीय प्रणाली शाळांना उपलब्ध करून दिली होती. त्यामध्ये गुण नोंद करताना शाळापातळीवर काही त्रुटी, चुका राहिल्याची बाब निदर्शनास आली आहे. ज्या शाळांना गुणांची नोंद करताना अडचणी आलेल्या आहेत. त्यांनी विभागीय शिक्षण मंडळात संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

खाऊच्या पैशांतून मदतीचा हात

कोल्हापूर : येथील युवा स्पोर्ट‌्सने कोरोनाच्या संकटात गरजू कुटुंबांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत समर्थ पांढरबळे, आयुष धर्माधिकारी, वेदांत माळवी, वेदिका माळवी, युवराज सूर्यवंशी या लहान मुलांनी खाऊसाठी साठविलेल्या पैशांतून प्रत्येकी दोन हजार रुपये धान्य, डाळी, तेल, आदी युवा स्पोर्ट‌्सकडे सुपुर्द केली. ही मदत गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यात आली. मदतीचा हात देणाऱ्या या लहान मुलांचा सत्कार माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी युवा स्पोर्ट‌्सचे सचिव उमेश पाटील, अनिल माळवी, गणेश पांढरबळे, प्रवीण सूर्यवंशी, शिवानी धर्माधिकारी उपस्थित होते.

फोटो (०५०७२०२१-कोल-युवा स्पोर्ट‌्स) : कोरोना काळात गरजू कुटुंबांना मदतीचा हात देणाऱ्या लहान मुलांचा माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विवेकानंद महाविद्यालयात ऑनलाइन कार्यशाळा

कोल्हापूर : येथील विवेकानंद महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत फिजिक्स आणि एनसीसी विभागाच्यावतीने संरक्षण दलातील नोकरीच्या संधी या विषयावर ऑनलाइन कार्यशाळा झाली. कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर. कुंभार यांचे हस्ते झाले. त्यामध्ये लेफटनंट कर्नल धनाजी देसाई, कॅप्टन श्याम कुमार (नेव्ही रिटायर्ड) यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत प्रा. एस. व्ही. मालगावकर, डॉ. एस.आय. इनामदार, कॅप्टन सुनीता भोसले, लेप्टनंट जे.आर. भरमगोंडा, अग्रणी महाविद्यालय योजनेचे समन्व्यक प्रा सी.जे. कांबळे, डॉ एस.आय. इनामदार, प्रा. स्नेहा कुंभार, आदी सहभागी झाले. कॅडेट तेजश्री सागावकर, आर्या जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: H.P. Patil has a Ph.D.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.