एचआरसीटी चाचणीचे दर ७०० रुपयांपर्यंत झाले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 06:54 PM2020-09-29T18:54:35+5:302020-09-29T18:55:38+5:30

राज्य शासनाने एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्चित केले असून १६ पर्यंत स्लाईसच्या मशीनवर चाचणीकरिता २ हजार रुपये, १६ ते ६४ स्लाईसच्या मशीनवरील चाचणीकरिता २ हजार ५०० रुपये आणि ६४ ते २५६ स्लाईसच्या मशीनवरील चाचणीसाठी ३ हजार रुपये असे दर निश्चित केले आहेत. हे दर पूर्वीच्या दरापेक्षा पाचशे ते सातशे रुपयांपर्यंत कमी आहेत.

HRCT test rates have come down to Rs 700 | एचआरसीटी चाचणीचे दर ७०० रुपयांपर्यंत झाले कमी

एचआरसीटी चाचणीचे दर ७०० रुपयांपर्यंत झाले कमी

Next
ठळक मुद्देएचआरसीटी चाचणीचे दर ७०० रुपयांपर्यंत झाले कमी प्रशासनाकडून नवे दर जाहीर : सरासरी दर तीन हजारांपर्यंत

कोल्हापूर : राज्य शासनाने एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्चित केले असून १६ पर्यंत स्लाईसच्या मशीनवर चाचणीकरिता २ हजार रुपये, १६ ते ६४ स्लाईसच्या मशीनवरील चाचणीकरिता २ हजार ५०० रुपये आणि ६४ ते २५६ स्लाईसच्या मशीनवरील चाचणीसाठी ३ हजार रुपये असे दर निश्चित केले आहेत. हे दर पूर्वीच्या दरापेक्षा पाचशे ते सातशे रुपयांपर्यंत कमी आहेत.

कोविड आणि नॉन कोविड रुग्णांसाठी एच.आर.सी.टी.चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी गठित केलेल्या समितीने राज्यातील विविध खाजगी रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांशी समन्वय साधून हे दर निश्चिती केली आहे. यामध्ये सी.टी.स्कॅन तपासणी, तपासणी अहवाल सी.टी.फिल्म,पी.पी.ई. किट, डिसइन्फेक्टंट, सॅनिटायझेशन चार्जेस व जीएसटीचा समावेश आहे. एच.आर.सी.टी नियमित व तातडीच्या तपासणीसाठी हे दर लागू राहणार आहेत.

शासन निर्णय येण्यापूर्वी कोणत्याही रुग्णालय किंवा तपासणी केंद्राचे दर नवीन दरापेक्षा कमी असल्यास, कमी असलेले दर तपासणीसाठी लागू राहतील. एच.आर.सी.टी तपासणी केल्यानंतर अहवालावर कोणत्या सी.टी. मशिन्सद्वारे तपासणी केली आहे ते नमूद करणे बंधनकारक असेल.

 

Web Title: HRCT test rates have come down to Rs 700

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.