HSC 12th Result 2022: कोल्हापूर विभाग राज्यात पाचव्या स्थानी, ९५.७ टक्के निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 12:39 PM2022-06-08T12:39:44+5:302022-06-08T12:40:38+5:30

गेल्यावर्षी कोल्हापूर विभाग ९९.९७ टक्क्यांसह राज्यात चौथ्या क्रमांकावर होता. यंदाच्या निकालात घसरण झाल्याने पाचव्या स्थानावर गेला आहे.

HSC 12th Result 2022: Kolhapur division ranked fifth in the state, 95.7 percent result | HSC 12th Result 2022: कोल्हापूर विभाग राज्यात पाचव्या स्थानी, ९५.७ टक्के निकाल

संग्रहित फोटो

googlenewsNext

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता बारावीचा ऑनलाईन निकाल आज, बुधवारी जाहीर झाला. त्यात ९५. ७ टक्के निकालासह कोल्हापूर विभाग राज्यात पाचव्या स्थानी राहिला. या विभागात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याचा समावेश आहे. गेल्यावर्षी कोल्हापूर विभाग ९९.९७ टक्क्यांसह राज्यात चौथ्या क्रमांकावर होता. यंदाच्या निकालात घसरण झाल्याने पाचव्या स्थानावर गेला आहे.

फेब्रुवारी-मार्च दरम्यान बारावीची परीक्षा झाली. त्यासाठी कोल्हापूर विभागातून १ लाख २१ हजार ९२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख २१ हजार ३४० जणांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख १५ हजार ३६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्या निकालाची एकूण टक्केवारी ९५.७ टक्के इतकी आहे. कोल्हापूर विभागात प्राविण्यासह प्रथम श्रेणीत ३५०७६ विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये ६४३७७, द्वीतीय श्रेणी ४०९०८ विद्यार्थी, तर उत्तीर्ण श्रेणीमध्ये ४२५७ जणांनी यश मिळविले.

यंदाही कोकण विभागाचीच बाजी

राज्यात एकूण ९४.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर दरवर्षी प्रमाणे यंदाची कोकण विभागानं बाजी मारली आहे. कोकण विभागातून सर्वाधिक ९७.२१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला असून ९०.९१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना निकाल दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाइन पद्धतीनं पाहता येणार आहे.

Web Title: HSC 12th Result 2022: Kolhapur division ranked fifth in the state, 95.7 percent result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.