लोकमतच्या महारक्तदान शिबिराला पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 08:08 PM2021-07-02T20:08:31+5:302021-07-02T20:12:24+5:30
Lokmat Blood Donetion Camp Kolhapur : नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं या लोकमतच्यावतीने आयोजित महारक्तदान शिबिराला, मानवतेच्या यज्ञाला शुक्रवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. रक्तदानातून जीवनदान देण्याच्या या अभियानात दानशूर कोल्हापूरकरांनी सक्रिय सहभाग घेत पहिल्याच दिवशी कोरोनाच्या या कठीण काळात माणुसकीची ज्योत अखंड तेवत राहील याची प्रचिती दिली, तसेच यानिमित्ताने आमच्या हातून एक सत्कार्य घडले याचे समाधान व्यक्त करत ह्यलोकमतह्णच्या कार्याला मनापासून शुभेच्छा दिल्या.
कोल्हापूर : नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं या लोकमतच्यावतीने आयोजित महारक्तदान शिबिराला, मानवतेच्या यज्ञाला शुक्रवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. रक्तदानातून जीवनदान देण्याच्या या अभियानात दानशूर कोल्हापूरकरांनी सक्रिय सहभाग घेत पहिल्याच दिवशी कोरोनाच्या या कठीण काळात माणुसकीची ज्योत अखंड तेवत राहील याची प्रचिती दिली, तसेच यानिमित्ताने आमच्या हातून एक सत्कार्य घडले याचे समाधान व्यक्त करत ह्यलोकमतह्णच्या कार्याला मनापासून शुभेच्छा दिल्या.
लोकमतचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यंदा कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने या शिबिराला व्यापक स्वरूप देत २ ते १५ जुलैदरम्यान जिल्ह्यात हे महारक्तदान शिबिराचे अभियान चालवले जाणार आहे. याचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी नागाळा पार्क येथील शाडू ब्लड सेंटरमध्ये ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.
यावेळी उद्योजक व ब्लड सेंटरचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, रोटरी समाज सेवा केंद्राचे राजेंद्र देशिंगे, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष मेघराज चुग, सचिव केदार राठोड, ह्यलोकमतह्णचे संपादक वसंत भोसले, सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, विक्रम चहाचे एरिया सेल्स मॅनेजर अभिजित देशमुख उपस्थित होते.
यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोरोनाच्या कठीण काळात रक्तदान हे मौल्यवान दान आहे, सध्या राज्यात सर्वत्र रक्ताचा मोठा तुटवडा आहे. शासनाकडून वारंवार नागरिकांना रक्तदान करा, असे आवाहन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर लोकमतने संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर घेतलेल्या रक्तदान शिबिर मोहिमेमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही चळवळ यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे आणि राज्यातून ५० हजारच नव्हे, तर १ लाख पिशव्या रक्ताचे संकलन व्हावे, अशा माझ्या शुभेच्छा आहेत.
लोकमतचे संपादक वसंत भोसले म्हणाले, १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात २० हजार पिशव्या इतके कमी रक्त शिलल्क आहे. सध्याच्या अडचणीच्या काळात रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज आहे. ही गरज भागवण्यासाठी ह्यलोकमतह्णने पुढाकार घेतला आहे. कोल्हापूर शहरासह जिल्हा, तालुके व गावागावांत ही मोहीम राबविली जाणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन आम्ही करत आहोत.
उद्घाटन सत्रानंतर दिवसभर रक्तदानासाठी नागरिकांची शाहू ब्लड सेंटरवर गर्दी होती. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून ते विविध क्षेत्रांतील मान्यवरांंनी रक्तदान करून या अभियानात सहभाग नोंदविला.
पहिला दाता
रक्तदान शिबिराचे उद्घाटन होण्यापूर्वीच अनेक नागरिक रक्तदानासाठी आले होते. बांधकाम साहित्याचा व्यवसाय असलेले सोहेल जमादार हे या अभियानाचे पहिले रक्तदाते ठरले. मी ह्यलोकमतह्णचा नियमित वाचक आहे. गेली तीन-चार दिवस रक्तदानाच्या बातम्या वाचत होतो. चांगल्या कार्यात आपलेही योगदान असावे म्हणून मी रक्तदानासाठी पुढे आलो. लोकमतच्या या कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत, अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
लग्नाचा वाढदिवस रक्तदानाने...
येथील जाहिरात एजन्सीचे मालक मंदार व अनुजा तपकिरे यांच्या लग्नाचा शुक्रवारी पाचवा वाढदिवस होता. हा दिवस त्यांनी रक्तदानाने साजरा केला. ह्यलोकमतह्णने रक्तदान शिबिराची सुरुवात केली त्यावर्षीपासून मी या अभियानाशी जोडलो आहे. एकाने रक्तदान केल्याने तीन लोकांचा जीव वाचतो. कोरोनाच्या या परिस्थितीत सामाजिक कार्यात आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून आम्ही दोघांनीही रक्तदान केले, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.