मानव जात विश्वासाठी : फारूक कुरेशी

By admin | Published: January 5, 2015 12:23 AM2015-01-05T00:23:22+5:302015-01-05T00:44:22+5:30

हजरत महंमद पैगंबर यांनी केलेले उपदेश ठरावीक समूह, प्रदेशासाठी नसून संपूर्ण

Human Being For The World: Farooq Qureshi | मानव जात विश्वासाठी : फारूक कुरेशी

मानव जात विश्वासाठी : फारूक कुरेशी

Next

कोल्हापूर : हजरत महंमद पैगंबर यांनी केलेले उपदेश ठरावीक समूह, प्रदेशासाठी नसून संपूर्ण मानव जात व विश्वासाठी आहेत, असे प्रतिपादन मुस्लिम पंचायत महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष फारुक एम. कुरेशी यांनी केले. ते मुस्लिम पंचायत व एम. एज्युकेशन कौन्सिलतर्फे संस्थेचे मुख्यालय असलेल्या शुक्रवार पेठ येथील तिरंगा-महल येथे झालेल्या ईद -ए -मिलाद/ पैगंबर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.फारुक एम. कुरेशी म्हणाले, समाजकारण, अर्थकारण, राजकारण, शिक्षण, आरोग्य, शेजार धर्म, मातृभूमीविषयी कर्तव्य, कुटुंब व्यवस्था, आदी मानवाच्या जन्मापासून त्याच्या आतापर्यंतच्या जीवनातील दिनचर्येबद्दल पैगंबर यांनी समग्र स्पष्ट मार्गदर्शन केले आहे. जेणेकरून, जगात मानवकल्याण व विश्वशांती प्रस्थापित होईल, हे पाहिले आहे. भारतीय मुस्लिमांनी निसंकोचपणे मोदी सरकारबाबत सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे पूर्वग्रहदूषित न राहता इस्लामचा अभ्यास केल्यास इस्लामबाबतचे भारतीय बांधवांचे गैरसमज दूर होतील. याप्रसंगी अ‍ॅड. गौस एन. महात म्हणाले, प्रत्येक मुस्लिमाने आपल्या सेवाभावी आचरणाने आपली ओळख निर्माण करावी. दरम्यान, कार्यक्रमाचा प्रारंभ सामुदायिक साफसफाईने झाला. खलील पटेल यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

Web Title: Human Being For The World: Farooq Qureshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.