साडेपाच महिन्यांनंतर शंभरावर नवे कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:25 AM2021-04-02T04:25:55+5:302021-04-02T04:25:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : साडेपाच महिन्यांनंतर कोल्हापूर जिल्ह्यात एका दिवसात १०० वर कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी ...

Hundreds of new corona patients after five and a half months | साडेपाच महिन्यांनंतर शंभरावर नवे कोरोना रुग्ण

साडेपाच महिन्यांनंतर शंभरावर नवे कोरोना रुग्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : साडेपाच महिन्यांनंतर कोल्हापूर जिल्ह्यात एका दिवसात १०० वर कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासात नवे १२२ रुग्ण नोंदवण्यात आले असून यामुळे प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. सध्या ८४४ जणांवर उपचार सुरू आहेत. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील ४७ वर्षीय महिलेचा येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

याआधी १३ ऑक्टोबर २०२० रोजी ११४ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर कोरोना रुग्णसंख्या कमी कमी होत गेली. डिसेंबर, जानेवारीमध्ये तर अगदी पाच ते बारा अशी रुग्णसंख्या येऊ लागली. परंतु मार्चमध्ये पुन्हा रुग्णसंख्येचा आलेख वाढू लागला. गेल्या आठवड्यात सरासरी नवे ६० रुग्ण आढळत होते. त्यानंतर हा आकडा ९० च्यावर गेला. गुरुवारी तर हा आकडा १२२ वर गेला आहे.

कोल्हापूर महापालिका क्षेत्रात ४५ रुग्ण आढळले असून नगरपालिका शहरांमध्ये ३१ रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. आजरा येथे दोन, हातकणंगलेत नऊ, कागलला एक, करवीरला सोळा, तसेच पन्हाळा, राधानगरीत प्रत्येकी दोन, शिरोळला एक आणि इतर जिल्ह्यातील १३ रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. दिवसभरामध्ये ५२५ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून १४४९ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. १९६ जणांची ॲन्टिजेन चाचणी करण्यात आली आहे. दिवसभरामध्ये कोणाचाही मृत्यू झालेला नसून ५१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

चौकट

जिल्ह्यातील आतापर्यंतची आकडेवारी...

गतवर्षीपासून नोंद झालेले कोरोना रुग्ण ५२ हजार १८२

डिस्चार्ज झालेले रुग्ण ४९ हजार ५६६

आतापर्यंतचे मृत्यू १७७२

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण ८४४

चौकट

आठवड्यातील रुग्णसंख्या

२६ मार्च ८३

२७ मार्च ७३

२८ मार्च ९३

२९ मार्च ९१

३० मार्च ८०

३१ मार्च ८१

१ एप्रिल १२२

Web Title: Hundreds of new corona patients after five and a half months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.