Fuel Hike : पेट्रोलची शंभरी, डिझेल नव्वदी पार,करांमुळे वाढले दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 06:17 PM2021-05-27T18:17:15+5:302021-05-27T18:19:12+5:30

Fuel Hike : आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील चढ-उतार आणि केंद्रासह राज्य सरकारच्या विविध करांच्या बोजामुळे गुरुवारी पेट्रोल १०० रुपये २२ पैसे, तर डिझेल ९० रुपये ४७ पैसे प्रतिलिटर भाव झाले. त्यामुळे आता एक लिटर पेट्रोलसाठी शंभर रुपयांची नोट मोजावी लागणार आहे. कोविडमुळे अनेकांच्या हाताला काम नाही. त्यात पेट्रोलची दरवाढ म्हणजे महागाईला आमंत्रण असल्याची संतप्त भावना सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.

Hundreds of petrol, ninety diesel, rates increased due to taxes | Fuel Hike : पेट्रोलची शंभरी, डिझेल नव्वदी पार,करांमुळे वाढले दर

Fuel Hike : पेट्रोलची शंभरी, डिझेल नव्वदी पार,करांमुळे वाढले दर

Next
ठळक मुद्दे पेट्रोलची शंभरी, डिझेल नव्वदी पार क्रूड दरातील चढ-उतारासह केंद्र, राज्य सरकारच्या करांमुळे वाढले दर

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील चढ-उतार आणि केंद्रासह राज्य सरकारच्या विविध करांच्या बोजामुळे गुरुवारी पेट्रोल १०० रुपये २२ पैसे, तर डिझेल ९० रुपये ४७ पैसे प्रतिलिटर भाव झाले. त्यामुळे आता एक लिटर पेट्रोलसाठी शंभर रुपयांची नोट मोजावी लागणार आहे. कोविडमुळे अनेकांच्या हाताला काम नाही. त्यात पेट्रोलची दरवाढ म्हणजे महागाईला आमंत्रण असल्याची संतप्त भावना सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.

गेल्या तीस वर्षांत पेट्रोल ७५, तर डिझेल ६५ रुपयांनी वाढले आहे. तरीसुद्धा कोल्हापूरकर दिवसाला ६ लाख २५ हजार लिटर डिझेल, तर ५ लाख ५० हजार लिटर पेट्रोल आपल्या वाहनातून घालून फिरतात. विशेष म्हणजे, गेल्या सहा महिन्यांत पेट्रोल तब्बल ९ रुपये ६९ पैशांनी, तर डिझेल १० रुपये ९० पैशांनी वाढले आहे. ही भाववाढ आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील क्रूड तेल प्रति बॅरेलच्या किमतीवर ठरते, असे म्हटले जाते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल वाढले की भावावाढ अटळ ठरते. मात्र, तेथे प्रति बॅरेलचे दर कमी झाले, तरी येथे मात्र कमी होत नाही, असा नागरिकांचा आरोप आहे.

सध्या लोकांच्या हातात पैसे नसल्याने त्याचा परिणाम पेट्रोल, डिझेल विक्रीवर झाला आहे. संचारबंदी लागू झाल्यापासून पेट्रोल, डिझेल विक्रीत ५० टक्के घट झाली आहे. यात आठ दिवसांचा लॉकडाऊनमध्ये हीच विक्री २० टक्केवर आली होती. त्यामुळे या काळात ८० टक्के विक्रीत घट झाली आहे.

लॉकडाऊन उठल्यानंतर, पुन्हा विक्रीत ३० टक्क्यांनी वाढ झाली असून, ती पूर्ववत ५० टक्केवर आली आहे. अनेकांनी वाहनांऐवजी सायकल चालविण्यास प्राधान्य दिले आहे. तरीसुद्धा पेट्रोल शंभरी पार केले म्हटल्यावर अनेकांंनी संताप व्यक्त केला आहे. या दरवाढीत केंद्र आणि राज्य सरकारचे करांचा बोजा मोठा आहे. हा पेट्रोल व डिझेलच्या मूळ किमतीपेक्षा अधिकचा आहे.

 

Web Title: Hundreds of petrol, ninety diesel, rates increased due to taxes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.