हंगेरियन लेखकास मॅन बुकर पुरस्कार
By admin | Published: May 21, 2015 12:35 AM2015-05-21T00:35:23+5:302015-05-21T00:35:23+5:30
हंगेरीचे लेखक लैझलो क्रास्जनहोरकई (६१) यांना ब्रिटनचा प्रतिष्ठेचा मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लंडन : हंगेरीचे लेखक लैझलो क्रास्जनहोरकई (६१) यांना ब्रिटनचा प्रतिष्ठेचा मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. साहित्य क्षेत्रातील या आघाडीच्या पुरस्काराच्या स्पर्धेच्या भारताचे अमिताव घोष यांच्यासह अन्य आठ जण होते.
परीक्षक मंडळाच्या प्रमुख व लेखिका मरिना वॉर्नर यांनी क्रास्जनहोरकई यांच्या कामाची तुलना फ्रान्झ काफ्का यांच्याशी केली. क्रास्जनहोरकई यांच्या व्यक्तिगत साहित्याचे ते नायक आहेत. १९८५ साली त्यांची ‘सँटियागो’ ही पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली.
दर दोन वर्षांनी दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप मानचिन्ह आणि ६०,००० पौंड असे आहे.
इंग्रजीतील साहित्यकृती वा इंग्रजीत झालेल्या एखाद्या अनुवादाच्या आधारे त्या लेखकाच्या कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. यापर्वूी हा पुरस्कार अरुंधती रॉय, अरविंद अडिगा यांच्यासह अनेकांना देऊन गौरविण्यात आले आहे.