हुपरी आरोग्य केंद्रास लसीचा वाढीव साठा मिळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:24 AM2021-05-08T04:24:34+5:302021-05-08T04:24:34+5:30

हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या हुपरी शहर व रेंदाळ, यळगूड, रांगोळी, जंगमवाडी या गावांतील ...

Hupari Health Center should get increased stock of vaccine | हुपरी आरोग्य केंद्रास लसीचा वाढीव साठा मिळावा

हुपरी आरोग्य केंद्रास लसीचा वाढीव साठा मिळावा

Next

हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या हुपरी शहर व रेंदाळ, यळगूड, रांगोळी, जंगमवाडी या गावांतील नागरिकांच्या लसीकरणासाठी लसीचा वाढीव साठा मिळावा. अत्यावश्यक सेवेतील नागरिकांच्या कोविड रॅपिड टेस्टकरिता अँटिजन किट उपलब्ध करून द्याव्यात, तसेच कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी नगर परिषदेला सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नगराध्यक्षा जयश्री महावीर गाट यांनी खासदार धैर्यशील माने यांच्याकडे केली.

खासदार माने यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हुपरी परिसरातील सर्वच गावांत दौरा करून परिस्थिती जाणून घेतली. त्यावेळी नगराध्यक्षा गाट यांनी खासदार माने यांची भेट घेऊन नगर परिषदेच्या वतीने अत्यावश्यक मागण्या त्यांच्यासमोर कथन केल्या. हुपरी नगर परिषदेला सर्व प्रकारच्या सुविधा व आनुषंगिक साहित्य याबरोबरच निर्जंतुकीकरण फवारणी कामांसाठी ट्रॅक्टरही उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन खासदार माने यांनी यावेळी नगराध्यक्षा गाट यांना दिले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, भाजप पक्षप्रतोद रफिक मुल्ला, मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार- ढेरे, नगरसेवक प्रतापसिंह देसाई, सुभाष कागले, शशिकांत मधाळे आदी उपस्थित होते.

-

फोटो ओळी-

कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी हुपरी (ता. हातकणंगले) नगर परिषदेला सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अशा मागणीचे निवेदन नगराध्यक्षा जयश्री महावीर गाट यांनी खासदार धैर्यशील माने यांना दिले. यावेळी रफिक मुल्ला, मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार- ढेरे, नगरसेवक प्रतापसिंह देसाई, सुभाष कागले, शशिकांत मधाळे आदी उपस्थित होते.

०७ हुपरी माने निवेदन

Web Title: Hupari Health Center should get increased stock of vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.