हुपरीचा पाणीपुरवठा अखेर सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:23 AM2021-07-28T04:23:58+5:302021-07-28T04:23:58+5:30
दूधगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे हुपरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नळ पाणीपुरवठा योजनेचे जल उपसा केंद्र पाण्याखाली गेले होते. परिणामी गेल्या ...
दूधगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे हुपरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नळ पाणीपुरवठा योजनेचे जल उपसा केंद्र पाण्याखाली गेले होते. परिणामी गेल्या तीन चार दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. ऐन पावसाळ्यात खंडित झालेल्या पाणीपुरवठयाअभावी शहरवासीयांची होणारी परवड थांबविण्यासाठी नगराध्यक्षा जयश्री गाट व मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार-ढेरे यांनी इतर सहकाऱ्यांसह बोटीच्या सहाय्याने महापुराच्या पाण्यातून जल उपसा केंद्रात जाऊन सोमवारी रात्री ९ वाजता शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरळीत केला. यावेळी त्यांच्यासोबत पक्ष प्रतोद रफिक मुल्ला, अमित गाट, नगरसेवक सूरज बेडगे, जयकुमार माळगे, सुभाष कागले, प्रतापसिंह देसाई, पाणी पुरवठा अभियंता प्रसाद पाटील, उदय कांबळे उपस्थित होते. या सर्वांनी सोमवारी सकाळपासून दिवसभर कार्यरत राहून व्हाईट आर्मी व महावितरण कर्मचाऱ्यांच्या मदतीने शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरळीत केला.