जनतेच्या सुखदु:खात सहभागी होता येत नसल्याची हुरहुर-- हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 12:03 PM2019-11-26T12:03:37+5:302019-11-26T12:04:55+5:30
जनतेच्या प्रत्येक सुखदु:खात धावून जाणारा आपण एक कार्यकर्ता आहे; पण अशा परिस्थितीमुळे गाठीभेटी घेता येत नसल्याचे आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.
कोल्हापूर : राज्यातील सत्तापेचामुळे विधानसभेचा निकाल लागून महिना उलटला तरी जनतेच्या आभाराला जाऊ शकलो नाही, त्याचबरोबर जनतेच्या सुखदु:खात सहभागी होता येत नसल्याची हुरहुर असल्याची माहिती आमदारहसन मुश्रीफ यांनी पत्रकातून दिली.
विधानसभेचे २१ आॅक्टोबरला मतदान झाले आणि २४ आॅक्टोबरला मतमोजणी झाली. पहिल्या आठवड्यात कागल शहर, गडहिंग्लज शहर, कडगाव-कौलगे व उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघात आभार दौरा पूर्ण केला; पण त्यानंतर राज्यात अभूतपूर्व सत्ता पेचामुळे मुंबईत राहावे लागले आहे; त्यामुळे इतर गावांना भेटी देता आल्या नाहीत. त्याचबरोबर या काळात पवार कुटुंब व राष्टÑवादीतच मतभेद झाले आणि घटनेचा आघात आपल्यावर झाला.
अशा परिस्थितीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. या राजकीय घडामोडींमुळे मुंबईतच राहावे लागत असून, रोज सकाळी सहापासून हजारोंच्या संख्येने येणारी जनता व कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहणारा व जनतेच्या प्रत्येक सुखदु:खात धावून जाणारा आपण एक कार्यकर्ता आहे; पण अशा परिस्थितीमुळे गाठीभेटी घेता येत नसल्याचे आमदारहसन मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.