‘लोकमत महामॅरेथॉन’च्या नावनोंदणीसाठी त्वरा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 11:30 AM2019-12-21T11:30:59+5:302019-12-21T11:34:29+5:30
‘लोकमत महामॅरेथॉन’च्या यंदाच्या तिसऱ्या पर्वातील सहभागासाठी नावनोंदणी करण्याकरिता आता मोजकेच दिवस उरले आहेत. कोल्हापूरच्या क्रीडाक्षेत्राची वेगळी ओळख बनलेल्या या महामॅरेथॉनमध्ये वैयक्तिक आणि ग्रुपच्या स्वरूपात धावपटू, नागरिकांना सहभागी होता येईल. सहभागी होणाऱ्यांना ग्रुप रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध आहे. कोल्हापूरमधील या महामॅरेथॉनच्या ‘सीझन-३’साठी लवकरात लवकर नोंदणी करा.
कोल्हापूर : ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या यंदाच्या तिसऱ्या पर्वातील सहभागासाठी नावनोंदणी करण्याकरिता आता मोजकेच दिवस उरले आहेत. कोल्हापूरच्या क्रीडाक्षेत्राची वेगळी ओळख बनलेल्या या महामॅरेथॉनमध्ये वैयक्तिक आणि ग्रुपच्या स्वरूपात धावपटू, नागरिकांना सहभागी होता येईल. सहभागी होणाऱ्यांना ग्रुप रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध आहे. कोल्हापूरमधील या महामॅरेथॉनच्या ‘सीझन-३’साठी लवकरात लवकर नोंदणी करा.
या महामॅरेथॉनच्या ‘सीझन-२’ला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता पुन्हा एकदा कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्र मॅरेथॉनमय होणार आहे. कोल्हापुरातील पोलीस क्रीडांगणातून ५ जानेवारी २०२० रोजी पहाटे पाच वाजता ‘लोकमत मॅरेथॉन’ची सुरुवात होणार आहे.
या महामॅरेथॉनमध्ये १२ वर्षांपेक्षा जास्त आणि धावण्याचा छंद असणाऱ्यांसाठी ‘फन रन’, १६ वर्षांपेक्षा जास्त वर्षांवरील व्यक्तींसाठी १० किलोमीटरची ‘पॉवर रन’ होणार आहे. १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी २१ किलोमीटरचा गट आणि तीन किलोमीटरची ‘फॅमिली रन’ आणि पाच किलोमीटर अंतराचा स्वतंत्र गट आहे. सर्व वयोगटांतील व्यक्तींना त्यामध्ये सहभागी होता येईल.
सैन्य आणि पोलीस दलातील धावपटूंसाठी २१ किलोमीटरचा ‘डिफेन्स’ हा वेगळा गट आहे. विविध पाच गटांमध्ये होणाऱ्या मॅरेथॉनमधील विजेत्यांना एकूण सहा लाखांची बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. त्यासह धावपटूंना आकर्षक मेडलही मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधा
या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी वेबसाईटवर आॅनलाईन रजिस्ट्रेशन करता येईल किंवा लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर; मोबाईल नंबर ९६३७३३०७०० अथवा ९७६७२६४८८५ वर संपर्क साधावा.
प्रकार (अर्ली बर्ड शुल्क) असे मिळणार साहित्य
- ३ किलोमीटर (फॅमिली रन) ४०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
- ५ किलोमीटर (फन रन) ५०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
- १० किलोमीटर (पॉवर रन) ११०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
- २१ किलोमीटर (हाफ मॅरेथॉन) ११०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
- २१ किलोमीटर (डिफेन्स गट) १००० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
धावण्याची शारीरिक क्षमता तपासून पाहणे अथवा सिद्ध करण्यासाठी धावपटूंसह नागरिकांसाठी मॅरेथॉन ही एक पर्वणी असते. अशीच पर्वणी कोल्हापुरात जानेवारीमध्ये ‘लोकमत महामॅरेथॉन’द्वारे उपलब्ध होते. या मॅरेथॉनचे नियोजन अत्यंत अचूक असते. त्यामध्ये जास्तीत जास्त धावपटू, नागरिकांनी सहभागी व्हावे.
-सचिन खोंद्रे,
प्रमुख, रिंगण फिटनेस
‘लोकमत महामॅरेथॉन’ ही पंचक्रोशीतील सर्वांत चांगली मॅरेथॉन आहे. त्यामध्ये महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यांमधील धावपटू सहभागी होतात. आजच्या धकाधकीच्या युगात ‘फिटनेस’ राखण्यासह ‘हेल्दी’ राहणे सर्वांसाठी महत्त्वाचे आहे. नव्या वर्षात आरोग्याच्या दृष्टीने एक चांगली सुरुवात नागरिकांनी ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये सहभागी होऊन करावी.
- क्षितीज बेलापुरे,
आयर्नमॅन