पत्नी गेली... पतीनेही सोडला काही क्षणातच प्राण, एकाच चितेवर दोघांवर अंत्यसंस्कार; शाहूवाडी तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 11:16 AM2022-01-28T11:16:00+5:302022-01-28T11:30:10+5:30

दाम्पत्याने असा एकाचवेळी जगाचा निरोप घेतल्याने पंचक्रोशीत हळहळ

Husband and wife died on the same day in Shahuwadi taluka | पत्नी गेली... पतीनेही सोडला काही क्षणातच प्राण, एकाच चितेवर दोघांवर अंत्यसंस्कार; शाहूवाडी तालुक्यातील घटना

पत्नी गेली... पतीनेही सोडला काही क्षणातच प्राण, एकाच चितेवर दोघांवर अंत्यसंस्कार; शाहूवाडी तालुक्यातील घटना

Next

येळवण जुगाई : पत्नीच्या निधनानंतर पतीने काही क्षणांतच प्राण सोडण्याची घटना बुधवारी सकाळी मांजरे (तालुका शाहूवाडी ) येथे घडली. ममताबाई शंकर पोवार  व पती शंकर बाबू पोवार असे या दाम्पत्याचे नाव आहे. दाम्पत्याने असा एकाचवेळी जगाचा निरोप घेतल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त झाली.

ममताबाई पोवार यांचे बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास निधन झाले. त्यांचा एक मुलगा कामानिमित्त मुंबईत असल्याने व नातू गोव्याहून येत असल्याने गावकरी त्यांची वाट पाहत होते. त्यांना गावी पोहोचण्यात सायंकाळचे साडेसात वाजले. सर्व विधी आटोपून मृतदेह उचलत आजारी असलेले त्यांचे पती शंकर पोवार यांनीही प्राण सोडला. पती-पत्नीची एकाचवेळी अंत्ययात्रा काढण्यात आली व एकाच चितेवर दोघांना अग्नी देण्यात आला.

या दोघांनी वैवाहिक आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले होते. कशाला ही न डगमगता संसाराचा गाडा चालवला होता. दोन्ही मुले व एक मुलगी यांचा विवाह केले. एक मुलगी मतिमंद असल्याने तिचा सांभाळ हेच करत होते; पण पत्नीच्या मृत्यूचा धक्का मात्र पतीस असाह्य झाला. वारकरी संप्रदायातील पोवार दाम्पत्याच्या अशा या मृत्यूमुळे पती-पत्नीमधील नाते मृत्यूनंतरही कायम राहिले.

Web Title: Husband and wife died on the same day in Shahuwadi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.