Kolhapur: तू ताबडतोब निघून ये, पत्नीला व्हिडीओ कॉल करून पतीने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 12:30 IST2025-04-07T12:30:09+5:302025-04-07T12:30:27+5:30

शिरोली : माहेरी गेलेल्या पत्नीला व्हिडीओ कॉल करून पतीने छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिजीत दत्तात्रय माने ...

husband ends his life by video calling his wife in shiroli kolhapur | Kolhapur: तू ताबडतोब निघून ये, पत्नीला व्हिडीओ कॉल करून पतीने संपवले जीवन

Kolhapur: तू ताबडतोब निघून ये, पत्नीला व्हिडीओ कॉल करून पतीने संपवले जीवन

शिरोली : माहेरी गेलेल्या पत्नीला व्हिडीओ कॉल करून पतीने छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिजीत दत्तात्रय माने (वय ३८, रा. एकता कॉलनी, शिरोली, ता. हातकणंगले) असे मृताचे नाव आहे. शनिवार (दि. ५) रोजी दुपारी साडेतीन वाजता ही घटना उघडकीस आली.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, अभिजीत माने हा फॅब्रिकेशनचे काम करत होता. फॅब्रिकेशन कामाची मोठी ऑर्डर असल्यामुळे तो पुण्यात होता. गुढीपाडव्यानिमित्त तो शिरोली येथे घरी आला होता. पण, माने हा दारूच्या आहारी असल्याने पती-पत्नीमध्ये वारंवार वाद व्हायचे. रोजच्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी दोन्ही मुलांना घेऊन माहेरी गेली होती.

अभिजीत माने याने दुपारी घरी जेवण करीत असताना पत्नीला व्हिडीओ कॉल केला. ''तू ताबडतोब निघून ये, नाहीतर मी गळफास घेऊन आत्महत्या करेन, असे तो पत्नीला सांगत होता. हे सांगत असताना त्याने बोलत बोलतच ओढणी घेऊन छताला असणाऱ्या पंख्याला गाठ मारत त्याचा फास गळ्यात अडकवला. प्रात्यक्षिक दाखवत असतानाच फास आवळला व त्याचा जागेवरच मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेची नोंद शिरोली पोलिस ठाण्यात झाली आहे.

Web Title: husband ends his life by video calling his wife in shiroli kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.