पतीला बँकेत नोकरी तरीही देशसेवेला पसंती; त्या 'आई'ला कुटुंबीयांचीही भक्कम साथ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 04:11 PM2023-03-16T16:11:58+5:302023-03-16T17:19:57+5:30

एका आई व बाळाची ताटातूट पाहून एखाद्या चित्रपटाला शोभेल असा प्रसंग उभा राहतो.

Husband works in a bank but prefers national service; Strong family support too varsharani of kolhapur women soldier | पतीला बँकेत नोकरी तरीही देशसेवेला पसंती; त्या 'आई'ला कुटुंबीयांचीही भक्कम साथ

पतीला बँकेत नोकरी तरीही देशसेवेला पसंती; त्या 'आई'ला कुटुंबीयांचीही भक्कम साथ

googlenewsNext

दिंडनेर्ली : सागर शिंदे

कोल्हापूर - एकीकडे मातृत्व, तर दुसरीकडे कर्तव्य अशी जबाबदारी पार पाडत भारतीय सीमा सुरक्षा दलामध्ये( BSF) कर्तव्य निभवणाऱ्या दऱ्याचे वडगाव (ता. करवीर) येथील वर्षा रमेश मगदूम- पाटील या प्रसूती व बालसंगोपन रजा संपल्यानंतर ११ महिन्याच्या 'दक्ष ' चिमूरड्याला घरी ठेवून कर्तव्यावर काल रुजू झाल्या. देशसेवेसाठी कर्तव्यावर निघालेल्या एका कणखर आईच्या मातृत्वाचा व्हिडिओ व्हायरल झाला व सर्वांचा ऊर अभिमानाने भरून आला. 

एका आई व बाळाची ताटातूट पाहून एखाद्या चित्रपटाला शोभेल असा प्रसंग उभा राहतो. हा व्हिडिओ पाहणाऱ्याच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या शिवाय राहत नाहीत. अशा वर्षा पाटील यांचे  ' माँ तुझे सलाम ' म्हणून कौतुक होत आहे. वर्षा यांचे नंदगाव (करवीर)हे माहेर.२०१४ साली आई,वडिल,भाऊ यांच्या भक्कम पाठिंब्यावरती वर्षा सीमा सुरक्षा दलामध्ये भरती झाल्या.खडतर प्रशिक्षण पूर्ण करून त्या गुजरात येथील भुज सीमेवर रुजू झाल्या. प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील राजपथावरील बीएसएफ मधील महिला रणरागिणींच्या दुचाकीचा चित्त थरारक प्रात्यक्षिकात वर्षाचा सहभाग थक्क करणारा आहे.

२०१९ ला दऱ्याचे वडगाव (ता. करवीर) येथील बँकेत नोकरी करणाऱ्या रमेश मगदूम यांचेशी विवाह झाला. पती रमेश व त्यांच्या कुटुबीयांनी ही भक्कम साथ दिली.२०२२ मध्ये बाळाचा जन्म झाल्या नंतर त्याचे नाव ही दक्ष ठेवले. मातृत्वाच्या आनंदाने भारावून गेलेल्या आईला प्रसुती व बालसंगोपन रजा संपल्यानंतर पुन्हा देशसेवेत रुजू व्हायचे होते याची जाणीव असलेने मनाची थोडी घालमेल होत असायची तरीदेखील रजेच्या कालावधीतील आनंद कुटुंबीयांसोबत मनमुरादपणे घेत सर्व क्षण बाळाला कुशीत घेत घालविले. मातृत्वाची ओढ असताना देखील कर्तव्याची जाणीव ठेवून या सर्वांना धैर्याने सामोरे जात मंगळवारी रात्री त्या गुजरातकडे रवाना झाल्या.सध्या त्यांची बदली राजस्थान येथे झाली आहे.
 
दरम्यान, पती, सासर व माहेरच्या मंडळींनी भक्कम साथ दिल्यानेच एक कर्तव्यदक्ष आई आज भारतीय सुरक्षा दलामध्ये देश सेवा बजावत आहे.
 

Web Title: Husband works in a bank but prefers national service; Strong family support too varsharani of kolhapur women soldier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.