सुपारी देऊन पतीचा खून

By admin | Published: March 6, 2017 12:38 AM2017-03-06T00:38:46+5:302017-03-06T00:38:46+5:30

जैताळ येथील घटना; पत्नी, सासऱ्यासह चौघांना अटक

Husband's blood by giving her handkerchief | सुपारी देऊन पतीचा खून

सुपारी देऊन पतीचा खून

Next

  पाचगाव : मारहाणीच्या जाचाला कंटाळून एक लाख रुपयांची सुपारी देऊन पत्नीने पतीचा जैताळ (ता. करवीर) येथे खून केल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. मृत सुजित सुरेश मोरे (वय ३६, रा. स्वामी समर्थ मंदिराजवळ, जवाहरनगर) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी करवीर पोलिसांनी संशयित आरोपी पत्नी पद्मा सुजित मोरे (३३) तिचे वडील प्रकाश लक्ष्मण तोडकर (६७), अविनाश धोंडिराम जांभळे (२८), चंद्रकांत बाबासो लोखंडे (२२, सर्व रा. पाचगाव, ता. करवीर) या चौघांना अटक केली. जैताळ येथील शेतवडीत एका तरुणाचा डोक्यात दगड घालून खून केल्याचे फिरायला जाणाऱ्या नागरिकांना रविवारी सकाळी दिसून आले. त्यांनी याबाबत करवीर पोलिसांना कळविले. पोलिस निरीक्षक दिलीप जाधव व सहकारी तत्काळ घटनास्थळी आले. मृत तरुणाची ओळख पटविणे तपासासाठी महत्त्वाचे होते. खून झाल्याचे समजताच या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. या गर्दीतीलच दोघा तरुणांनी खून झालेला आपला आत्तेभाऊ सुजित मोरे असल्याचे ओळखले. यानंतर पोलिसांनी तातडीने सुजितचा भाऊ सुधीरला घटनास्थळी बोलावून घेतले. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर सुधीरकडे केलेल्या चौकशीमध्ये सुजितचापत्नीशी वारंवार वाद होत असल्याचे पुढे आले. पोलिसांनी पत्नी पद्मा हिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने वडील, भावाचे मित्र अविनाश व चंद्रकांत यांनी खून केल्याची कबुली दिली. संशयित पद्मा ही धुण्याभांड्याची कामे करते. महिनाकाठी तिला तीन हजार रुपये मिळतात. त्यातूनही तिने पतीला संपविण्यासाठी एक लाख रुपयांची सुपारी दिली होती. संशयित जांभळे हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे. त्याच्यावर २०१३ मध्ये वाघाचे कातडे तस्करी केल्याचा गुन्हा दाखल आहे. (वार्ताहर) -------------- भावाच्या मित्राला दिली सुपारी सुजित मोरे व पद्माचे पंधरा वर्षांपूर्वी लग्न झाले. त्यांना दोन मुले आहेत. तो जवाहरनगर येथे राहतो. सेंट्रिंगची कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत होता. गेल्या सहा महिन्यांपासून सुजित हा चारित्र्याच्या संशयावरून पत्नी पद्माला दारू पिऊन मारहाण करीत असे. या त्रासाला कंटाळून ती मुलांसह माहेरी निघून गेली. त्यानंतर तिने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला. त्याच्या तारखा सुरू आहेत. सुजित हा पाचगावमध्ये येऊन पत्नीसह मुलांना व सासऱ्याला मारहाण करीत असे. त्याच्या रोजच्या त्रासाला कंटाळून सर्वजण स्वत:चे घर सोडून भाड्याने राहू लागले. या ठिकाणीही तो त्रास देऊ लागल्याने पद्मा हैराण झाली होती. तिने पतीचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. भावाचा मित्र अविनाश जांभळे याला फोन करून घरी बोलावून घेतले. ‘माझा पती खूप त्रास देत आहे. तुला एक लाख रुपये देतो, त्याचा काटा काढ,’ असे सांगितले. त्यानुसार जांभळे याने मित्र चंद्रकांत लोखंडे याची मदत घेऊन कट रचला. असा केला खून... सुजित हा कबनूर-इचलकरंजी येथे सेंट्रिंग कामासाठी गेला होता. तेथून तो पत्नी पद्माला फोन करीत असे. अविनाशने पद्माला सुजितला गोड बोलून जैताळ येथे बोलावून घे, असे सांगितले. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सुजितचा फोन आल्यावर तिने मी जैताळला राहत आहे, तू तिथे ये असे सांगितले. रात्री साडेआठच्या सुमारास तो जैताळ येथे आला. याठिकाणी बनसोडे नावाचे कुटुंब राहते. त्यांच्या घरातील मोबाईलवरून पद्माला फोन करून ‘मी येथे आलो आहे. तू कुठे आहेस,’ अशी विचारणा केली. त्यावर तिने ‘तिथेच थांबा, आलो’ म्हणून फोन ठेवला. जांभळेला बोलावून पाच हजार रुपये अ‍ॅडव्हान्स देऊन पती जैताळ येथे थांबल्याचे सांगितले. त्यानंतर जांभळे व लोखंडे दुचाकीवरून जैताळ येथे आले. सुजित दारू पिऊन होता. त्याला निर्जनस्थळी नेऊन काठ्यांनी बेदम मारहाण केली. तो बेशुद्ध पडल्यानंतर ते पुन्हा पाचगावमध्ये आले. त्यानंतर पद्माचे वडील प्रकाश तोडकर यांना घेऊन गेले. रस्त्याकडेला सुजित बेशुद्धावस्थेत पडला होता. सासरा तोडकर याने त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार मारले. त्यानंतर तिघेही घरी निघून आले.

Web Title: Husband's blood by giving her handkerchief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.