हैदराबादच्या प्रवाशांचे होणार कोल्हापुरात स्वागत, नोंदणी सुरू; अलायन्स एअरची सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:10 AM2018-10-22T11:10:21+5:302018-10-22T11:12:04+5:30
हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर विमानसेवा अलायन्स एअर कंपनीकडून पुरविली जाणार आहे. त्यासाठी नोंदणी (बुकिंग) सुरू आहे. दि. १ नोव्हेंबरला हैदराबादहून येणाऱ्या प्रवाशांचे कोल्हापुरात स्वागत केले जाणार आहे.
कोल्हापूर : हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर विमानसेवा अलायन्स एअर कंपनीकडून पुरविली जाणार आहे. त्यासाठी नोंदणी (बुकिंग) सुरू आहे. दि. १ नोव्हेंबरला हैदराबादहून येणाऱ्या प्रवाशांचे कोल्हापुरात स्वागत केले जाणार आहे.
केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर अशी विमानसेवा अलायन्स एअर या कंपनीकडून सुरू होणार आहे. एटीआर हे ७२ सीटर विमान कोल्हापूरहून हैदराबाद आणि बंगलोर या शहरांसाठी उड्डाण घेणार आहे. या सेवेच्या तिकीट नोंदणीसाठी आॅनलाईन प्रक्रिया बुधवार (दि. १७) पासून सुरू झाली.
एअर इंडिया डॉट इन यासह इतर दोन वेबपोर्टलवर याची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. दि. १ नोव्हेंबरला सकाळी १०.४५ वाजता हैदराबाद येथून विमानाचे उड्डाण होईल. त्याचे कोल्हापुरात दुपारी १२. १० वाजता आगमन आणि बंगलोरच्या दिशेने दुपारी १२.३५ वाजता उड्डाण होणार आहे.
दुपारी चार वाजता कोल्हापुरात विमान येणार असून, दुपारी साडेचार वाजता ते हैदराबादकडे रवाना होणार आहे. या दिवशी हैदराबादहून कोल्हापुरात येणाऱ्या पहिल्या फ्लाईटमधील प्रवाशांचे स्वागत केले जाणार आहे.