‘मी माझ्या प्रभागात ... पत्नी, आई, मुलगी पलीकडील प्रभागात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:20 AM2020-12-24T04:20:41+5:302020-12-24T04:20:41+5:30

कोल्हापूर : ‘मी या प्रभागातून... पत्नी पलीकडील प्रभागातून’. ‘मी या प्रभागातून..... आई शेजारच्या प्रभागातून’. ‘मी इकडून ... माझी मुलगी ...

‘I am in my ward ... wife, mother, daughter in the other ward’ | ‘मी माझ्या प्रभागात ... पत्नी, आई, मुलगी पलीकडील प्रभागात’

‘मी माझ्या प्रभागात ... पत्नी, आई, मुलगी पलीकडील प्रभागात’

Next

कोल्हापूर : ‘मी या प्रभागातून... पत्नी पलीकडील प्रभागातून’. ‘मी या प्रभागातून..... आई शेजारच्या प्रभागातून’. ‘मी इकडून ... माझी मुलगी जुन्या प्रभागातून’. ही व्यवस्था निर्माण केली आहे इच्छुक उमेदवारांनी ! महापालिकेच्या निवडणुकीतील आरक्षण जाहीर होताच अनेक मातब्बर इच्छुक उमेदवारांनी आपापली नावेच त्या त्या प्रभागावर लिहून आपली आरक्षणे टाकली असून प्रचारालाही लागले आहेत.

काेल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनेकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आपला प्रभाग तो आपलाच शिवाय शेजारचाही आपलाच प्रभाग असून आपण सहज निवडून येऊ शकतो असा अनेकांचा भ्रम झाला आहे. त्यामुळे एका प्रभागातून निवडणूक लढविण्यापेक्षा दोन दोन प्रभागातून निवडणूक लढविण्याची क्रेझ कोल्हापूर शहरात तयार होत आहे. एकेकाळी बंडोपंत नाईकवडे- सुलोचना नाईकवडे, प्रकाश नाईकनवरे- प्रतिभा नाईकनवरे (पती-पत्नी), कांचन कवाळे- कादंबरी कवाळे (सासू-सून), किरण दरवान-अलका जाधव (बहीण-भाऊ), संभाजी जाधव - जयश्री जाधव (दीर- भावजय), चंद्रकांत सांगावकर- सुवर्णा सांगावकर (दीर- भावजय) यांनी एकाच कुटुंबातील दोन सदस्यांनी प्रतिनिधीत्व केले. तशाच पध्दतीने यंदाच्या निवडणुकीतही एकाच कुटुंबातील दोन दोन सदस्य वेगवेगळ्या प्रभागातून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे.

मागच्या सभागृहात प्रतिनिधीत्व केलेल्या काही नगरसेवकांचे हक्काचे प्रभाग आरक्षणामुळे हातातून निसटले आहेत. तर काही मोजक्या नगरसेवकांना स्वत:चा प्रभाग तर मिळालाच शिवाय शेजारचा प्रभागही सोयीचा वाटत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून ‘मी अमूक प्रभागातून, पत्नी तमूक भागातून’ , ‘मी या प्रभागातून तर आई पलीकडील भागातून, ‘मी पलीकडच्या प्रभागातून तर माझी मुलगी माझ्या प्रभागातून’ असे सांगत आपले व आपल्या कुटुंबातील सदस्यांची आरक्षणे टाकून ठेवण्यास सुरुवात केली.

इच्छुक उमेदवारांनी आपले द्रोण लावून ठेवले असले तरी ते ज्या पक्षातून निवडणूक लढविणार आहेत, त्या पक्षाकडून दोघा दोघांना उमेदवारी मिळणार का हा खरा प्रश्न आहे. जर एकालाच उमेदवारी मिळाली तर दुसऱ्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे. असा प्रकार मागच्या निवडणुकीत शाहूपुरी तालीम व व्हीनस कॉर्नर प्रभागात झाला होता. प्रकाश नाईकनवरे यांनी व्हीनस कॉर्नरमधून तर सून पूजा नाईकनवरे यांनी शाहूपुरी तालीम येथून निवडणूक लढविली. पूजा या विजयी झाल्या तर थोडक्या मतांनी त्यांचा प्रकाश नाईकनवरे यांचा पराभव झाला. परंतू यंदाच्या निवडणुकीतही किमान दहा ते बार कुटुंबे दोन दोन प्रभागात उभे राहण्याची तयारी करत आहेत.

Web Title: ‘I am in my ward ... wife, mother, daughter in the other ward’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.