मी शेतकऱ्यांचा नेता नाही, पण शेतकऱ्यांचा मित्र - उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 09:29 PM2019-04-20T21:29:49+5:302019-04-20T22:02:23+5:30
मी शेतकऱ्यांचा नेता नाही शेतकऱ्यांचा मित्र आहे. शेतकऱ्यांचा खांद्याला खांदा लावून मी शेतकऱ्यांसाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत उभा आहे, असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले.
हातकणंगले - मी शेतकऱ्यांचा नेता नाही शेतकऱ्यांचा मित्र आहे. शेतकऱ्यांचा खांद्याला खांदा लावून मी शेतकऱ्यांसाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत उभा आहे, असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यासाठी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा प्रामुख्याने उल्लेख केला.
हातकणंगले येथील सभेत उद्धव ठाकरे म्हणाले की, ''शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही निवडणूक आहे. गेली कित्येक वर्षे शेतकऱ्यांचा नेताच नाही. मी शेतकऱ्यांचा नेता नाही शेतकऱ्यांचा मित्र आहे. शेतकऱ्यांचा खांद्याला खांदा लावून मी शेतकऱ्यांसाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत उभा राहीन. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मला हसू पाहायचे आहे.
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला अभिमान वाटावा, असे मला वाटते.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी राजू शेट्टींवरही निशाणा साधला. '' राजू शेट्टी काय कसली शिट्टी ? आपल्याला शिट्टी नको आहे.
आपल्याला विजयाची तुतारी वाजवायची आहे. याचा आवाज दिल्लीपर्यंत गेला पाहिजे.''असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणामधील महत्त्वाचे मुद्दे
- मी शेतकऱ्यांचा नेता नाही शेतकऱ्यांचा मित्र
- महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला अभिमान वाटावा
-शेतकऱ्यांच्या पाठिशी शिवसेना उभी राहीली याचे मला समाधान
-शेतकरी जे आंदोलन करतील त्यांच्यासोबत शिवसेना जाहीरपणे सहभाग घेईल
- जिल्हा साफ करण्यासाठी पहिला खासदार घालवा चांगला खासदार दिल्लीत पाठवा
- सीमेवर लढणाऱ्या जवानांना कळाल पाहिजे की भारतात काय तर महाराष्ट्रात सुद्धा मर्द जवान आहेत की जे जवानांच्या पाठीशी उभे राहणारे सरकार निवडून आणणार आहेत