'शरद पवारांबद्दल वाईट बोललो नाही, पण मला दु:ख झालं; भुजबळांची बीडमध्ये टीका, कोल्हापूरात कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 08:34 PM2023-09-10T20:34:14+5:302023-09-10T20:35:08+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता शरद पवार गट आणि अजित पवार गटाचे राज्यभर सभा सुरू आहेत.

'I didn't speak badly about Sharad Pawar, but I felt sad; Bhujbal criticized in Beed, praised in Kolhapur | 'शरद पवारांबद्दल वाईट बोललो नाही, पण मला दु:ख झालं; भुजबळांची बीडमध्ये टीका, कोल्हापूरात कौतुक

'शरद पवारांबद्दल वाईट बोललो नाही, पण मला दु:ख झालं; भुजबळांची बीडमध्ये टीका, कोल्हापूरात कौतुक

googlenewsNext

कोल्हापूर- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता शरद पवार गट आणि अजित पवार गटाचे राज्यभर सभा सुरू आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी खासदार शरद पवार यांनी केल्हापूरात सभा घेतली होती. आता कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तरसभा घेतली आहे. या सभेला मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनिल तटकरे यांच्यासह अन्य नेत्यांनी उपस्थिती लावली आहे. आजच्या सभेत बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे कौतुक केले, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.

टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडूंना १४ दिवसांची कोठडी; भ्रष्टाचार प्रकरणी केली होती अटक

बीडमध्ये झालेल्या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती, यावेळी दोन्ही गटातील नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप केले होते, आता कोल्हापुरातील सभेत छगन भुजबळ यांनी कौतुक केले आहे. 

मंत्री छगन भुजबळ म्हणाले, लोक आम्हाला विचारत आहे, सत्तेत का गेले? आम्ही विकासासाठी सत्तेत सहभागी झालो आहोत. महात्मा फुले यांनी सुद्धा सांगितलं तुम्ही सत्तेत राहुल लोकांचा विकास करु शकता. डॉ बाबासाहेब आंबेडकर जर सत्तेत गेले. दिल्लीत गेले, मंत्री झाल्यानंतर त्यांनी संविधानात समान न्याय दिला कारण ते सत्तेत गेले होते, असंही भुजबळ म्हणाले.

"बीड मधील सभेत शरद पवार साहेबांना मी काही वाईट बोललो नाही. मी माझे दु:ख सांगितले आहे. अनेकांनी माझ्यावर टीका केली. पण मनातील दु:ख सांगायचं नाही का? आम्ही फक्त प्रश्न विचारला. आम्ही आता लोकांची सेवा करायची ठरवलं आहे, असंही भुजबळ म्हणाले.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले, ६ जून १९९३ जालन्यात महात्मा समता परिषदेची एक लाख लोकांची रॅली झाली. शरद पवार तेव्हा मुख्यमंत्री होते. व्ही पी सिंग यांनी लागू केलेलं आरक्षण शरद पवार यांनी महाराष्ट्रात लागू करण्याचा निर्णय घेतला. धनगर, तेली, माळी, कुणबी या सर्वांना आरक्षण देण्याचे काम पवारसाहेबांनी केलं ते आम्ही विसरु शकत नाही, असं कौतुकही पवारांची भुजबळ यांनी केले. ५४ असलेल्या ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले. मराठा समाजाला देखील आरक्षण मिळाले पण ते आरक्षण टिकावू असाव, कुणावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, असंही छगन भुजबळ म्हणाले.

Web Title: 'I didn't speak badly about Sharad Pawar, but I felt sad; Bhujbal criticized in Beed, praised in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.