सदाभाऊंची घराणेशाही मला मान्य नाही : शेट्टी

By Admin | Published: February 14, 2017 12:56 AM2017-02-14T00:56:22+5:302017-02-14T00:56:22+5:30

संघटनेने ठरविले तर राज्यमंत्रिपद सोडावे लागेल

I do not agree with the grandfather of Sadbhau: Shetty | सदाभाऊंची घराणेशाही मला मान्य नाही : शेट्टी

सदाभाऊंची घराणेशाही मला मान्य नाही : शेट्टी

googlenewsNext



कोल्हापूर : गेली पंधरा वर्षे ‘शेतकरी संघटनेचा नेता’ म्हणून दोन्ही काँग्रेसवाल्यांच्या घराणेशाहीविरुद्ध आम्ही डंका पेटविला आणि माझाच सहकारी पुन्हा त्याच वाटेने जाणार असेल तर ते माझ्या ‘इथिक्स’मध्ये बसत नाही, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. लातूर येथे ते एका खासगी दूरचित्रवाहिनीशी बोलत होते. त्यानंतर ‘लोकमत’ने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हीच भूमिका पुन्हा स्पष्टपणे मांडली.
कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत हा सांगली जिल्ह्यातील बागणी (ता. वाळवा) जिल्हा परिषद मतदारसंघातून रयत विकास आघाडीतून निवडणुकीस उभा आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांना विचारणा केली असता शेट्टी म्हणाले, ‘काँग्रेसवाल्यांच्या घराणेशाहीविरुद्ध मी गेली पंधरा वर्षे डंका पेटवत आहे. आता ही सर्वच पक्षांतील अनेक नेत्यांची पोरंटोरं या निवडणुकीत उभी आहेत. नेत्यांनीच आपल्या पोरांना निवडणुकीत उभे केले तर पक्षासाठी, संघटनेसाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार, असा माझा सवाल आहे. त्यामुळे सदाभाऊंनी मुलाला निवडणुकीत उभे केले हे मला पटलेले नाही. काही ‘इथिक्स’ पाळून मी राजकारण करतो. त्यामध्ये हे माझ्या मनाला हे पटत नाही. सदाभाऊंनी आपल्या मुलाला उमेदवारी देऊन पक्षात घराणेशाही आणली. सत्तेचा मोह चांगला नाही. तो वेळीच आवरला नाही तर सदाभाऊंचा पाशा पटेल होईल.
’खासदार शेट्टी म्हणाले,‘राज्यातील सरकारबद्दल लोकांत अस्वस्थता आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सत्तेची समीकरणे बदलतील की काय अशी शक्यता वाटत आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जे मत प्रदर्शित होईल त्यावर भविष्यातील राजकारणाची दिशा निश्चित करू. आम्ही नेहमीच जनमताचा आदर केला आहे. त्यामुळे निकालाचे चिंतनही आम्ही जरूर करू.
राज्यातील लोकशाही आघाडीचे भ्रष्ट सरकार उलथवून टाकण्यासाठी काही तात्त्विक मतभेद असतानाही त्यावेळी भाजपसोबत गेलो;
परंतु हे सरकारच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणार नसेल तर त्या अस्वस्थेचीही दखल घ्यावी
लागेल. सदाभाऊ हे संघटनेचे प्रतिनिधी म्हणून त्यांना राज्यमंत्रि-पदाची संधी दिली. त्यामुळे संघटनेने सत्तेबाबत वेगळा
निर्णय घेतला तर तो त्यांनाही मान्य करावा लागेल.’

Web Title: I do not agree with the grandfather of Sadbhau: Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.