यायला लागतंय... नव्हे, यायचंच...!

By Admin | Published: October 13, 2016 02:00 AM2016-10-13T02:00:30+5:302016-10-13T02:07:50+5:30

नवनवीन घोषणांचा उदय : क्रांती मोर्चाच्या डिजिटल फलकांनी शहर ‘मराठा’मय

I do not want to come ... No, yes ...! | यायला लागतंय... नव्हे, यायचंच...!

यायला लागतंय... नव्हे, यायचंच...!

googlenewsNext

संतोष तोडकर -कोल्हापुरात शनिवारी निघणाऱ्या भव्य मराठा मोर्चात सहभागी होण्याबाबत आवाहन करणाऱ्या डिजिटल फलकांनी सारे शहर मराठामय झाल्याचे दिसून येत आहे. ‘यायला लागतंय.... नव्हे, यायचंच...!’ या कोल्हापुरी निरोपाचे फलक चौकाचौकांत दिसत आहेत.
शहरातील शिवाजी चौक, बिंदू चौक, पापाची तिकटी, मिरजकर तिकटी, गंगावेश, रंकाळा वेश, राजारामपुरी, शाहूपुरी, साने गुरुजी वसाहत, वाशी नाका, शिवाजी पेठ, तावडे हॉटेलचा परिसर, कळंबा रोड, उद्यमनगरसह जवळजवळ सर्वच भागांतील तरुण मंडळे, ग्रुप्स, तालीम मंडळे, संघटनांनी मोर्चाच्या समर्थनार्थर् ंडिजिटल फलक लावले आहेत.
क्रांती मोर्चाच्या दसरा वॉर रूममधून ‘भावांनो... यायला लागतंय’, ‘इतिहास घडविण्यासाठी मराठ्यांनो एकत्र या..!,’, ‘आता मराठा गप्प बसणार नाही’, ‘आम्ही जिजाऊंच्या लेकी, अन्यायाविरुद्ध झाली आमची एकी’, ‘उठा मराठ्यांनो उठा... जागे व्हा! सामील व्हा’, ‘मी येणार, तुम्ही पण या’, ‘मराठ्यांनो उठा, जागे व्हा, आता नाही तर कधीच नाही.. लई केलं इतरांसाठी, आता फक्त मराठा समाजासाठी’, ‘तख्तासाठी विखुरलेला मराठा रक्तासाठी एकत्र येणार’, ‘आजवर लढलो मातीसाठी, एक लढा जातीसाठी’ या घोषणा निश्चित केल्या आहेत. जिल्ह्णातील विविध तालुके, गावांमधून तसे फलक झळकू लागले आहेत. विविध तालीम मंडळे, ग्रुप्स, मंडळांतील कार्यकर्त्यांच्या कल्पकतेतून ‘नका ठेवू वाईट नजरा जिजाऊंच्या लेकींवर.. पेटून उठेल महाराष्ट्र सारा मराठ्यांच्या एकीवर’, ‘अन्यायाविरुद्ध करूया बंड... कोपर्डीच्या गुन्हेगारांना मिळालाच पाहिजे मृत्युदंड’, ‘मरहट्टा मराठा, मेल्यावरच हटणार मराठा,’ ‘यायला लागतयंच’, ‘प्रक्षुब्ध मनाचा नि:शब्द हुंकार’, ‘महाराज लढले हिंदवी स्वराज्यासाठी... आपण लढूया आपल्या हक्कांसाठी’, ‘आमच्या मराठ्यांचं कसं असतं... आम्ही सगळे कुठे जात नाही.. आणि गेलो तर मोजता पण येत नाही’, ‘तलवारीचे घाव अन् मराठ्यांचे नाव... एकदा कोरले की कोरलेच... मग इतिहास असो की शत्रूचा श्वास’, ‘आमची शांतता तुम्हाला दहशत वाटत असेल तर विचार करा, आमची दहशत कशी असेल’ अशा घोषणांनी गल्लीबोळ मराठामय झाले आहेत.


घोषणांची कल्पकता
क्रांती मोर्चाच्या दसरा वॉर रूममधून तरुणाई कल्पकता पणाला लावत आहे. नवनवीन घोषवाक्ये, कवितांचा अक्षरश: पाऊस पडत आहे.

Web Title: I do not want to come ... No, yes ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.