Hasan Mushrif ED Raid: जिल्हा बँकेतील छापेमारीवर मुश्रीफ म्हणाले, माझ्या नावाने तर..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 02:19 PM2023-02-02T14:19:40+5:302023-02-02T14:24:53+5:30

त्यावर मी भाष्य करणार नाही

I don even have a locker in the bank in my name, MLA Hasan Mushrif reacts on ED district bank raid | Hasan Mushrif ED Raid: जिल्हा बँकेतील छापेमारीवर मुश्रीफ म्हणाले, माझ्या नावाने तर..

Hasan Mushrif ED Raid: जिल्हा बँकेतील छापेमारीवर मुश्रीफ म्हणाले, माझ्या नावाने तर..

Next

कोल्हापूर : जिल्हा बँकेत मी कर्जदार नाही, अगर मी कोणाला जामीनदारही नाही. तसेच, माझ्या नावाने बँकेमध्ये लॉकरसुद्धा नाही. बँकेचा अध्यक्ष म्हणून मी कसलीही आणि कोणतीही सुविधा घेत नाही. अधिकाऱ्यांच्या छाननी समितीने शिफारस केलेल्या संस्थांना, कंपनीना व फर्मना आम्ही कर्जपुरवठा करतो. गेल्या सात-आठ वर्षांच्या अध्यक्षपदाच्या काळात शिफारसीपेक्षा ज्यादा एक रुपयाही कर्ज दिलेले नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. 

ते म्हणाले, ईडीने घोरपडे साखर कारखाना आणि ब्रिस्क कंपनी यांच्या व्यवहारांशी संबंधित असलेल्या कागदपत्रांची चौकशी केली. या दोन्हीही संस्थांचे कर्ज योग्य पद्धतीनेच दिले आहे. यापैकी कोणतेही खाते एनपीए नाही.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वरदायिनी असलेल्या बँकेबाबत बोलायचे झाले तर अनेक वर्ष रक्त आटवून व अपार कष्ट करून आम्ही ही बँक लौकिकाला आणलेली आहे. ईडीचा तपास सुरू आहे. तो तपास प्रभावित होईल. त्यामुळे, त्यावर मी भाष्य करणार नाही. 

दरम्यान, ईडीची रेड झाली हे एका अर्थाने चांगलं झालं. कारण, काही विघ्नसंतोषी लोकांनी ईडीच्या अधिकाऱ्यांच्या मनात मी स्वतः केडीसीसी बँकेचा अध्यक्ष आहे तसेच कारखाना याबाबत जे जे गैरसमज निर्माण केले असतील त्या सगळ्यांचे निराकरण होईल.

Web Title: I don even have a locker in the bank in my name, MLA Hasan Mushrif reacts on ED district bank raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.