दिलीप कमार यांनी दिलेली थप्पड आज आठवणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:17 AM2021-07-08T04:17:44+5:302021-07-08T04:17:44+5:30
‘ राम और शाम’ चित्रपटात ‘मैं कागल गाव कां शामराव’ हा छोटासा संवादही त्या काळी कागलवासीयांना अंगावर ...
‘ राम और शाम’ चित्रपटात ‘मैं कागल गाव कां शामराव’ हा छोटासा संवादही त्या काळी कागलवासीयांना अंगावर शहारे आणणारा होता. वहिदा रहिमान आणि दिलीप कुमार यांच्यावर येथील दुधगंगा नदीजवळ हे चित्रीकरण झाले होते.
‘राम और शाम’ हा चित्रपट १९६७ मध्ये आला होता. दिलीप कुमार चित्रीकरणासाठी आले आहेत. हे समजल्यावर अनेकजण पळत आणि सायकलीने दुधगंगा नदी पुलावर गेले होते. गाण्यातील एका दृश्याचे चित्रीकरण व्यवस्थित होत नव्हते. म्हणून आधीच दिलीप कुमार त्रस्त झाले होते. आणि एका चाहत्याने वारंवार हाक मारून आणि शेरेबाजीही करणे सुरू केले. वैतागलेले दिलीप कुमार यांनी चित्रीकरण सोडून थेट त्याच्या जवळ आले आणि काही कळायच्या आत श्रीमुखात भडकविली. या आठवणीबरोबरच कागलचा शामराव या आठवणी कायमच स्मरणात राहिल्या.
सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी एस. एम. मुश्रीफ आणि त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या कन्येच्या लग्नास दिलीप कुमार हजर होते. पुण्यात झालेल्या या लग्नास कागलची अनेक मंडळी उपस्थित होती. तर ते राज्यसभेचे खासदार असताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचा खासदारकीचा निधी कागल तालुक्यासाठी आणला होता.