मला महाविद्यालयाने कमी गुण दिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:25 AM2021-08-26T04:25:15+5:302021-08-26T04:25:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मला महाविद्यालयाने अंतर्गत गुण कमी दिले असल्याची तक्रार कोल्हापूर विभागातील बारावी उत्तीर्ण झालेल्या ३० ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मला महाविद्यालयाने अंतर्गत गुण कमी दिले असल्याची तक्रार कोल्हापूर विभागातील बारावी उत्तीर्ण झालेल्या ३० विद्यार्थ्यांनी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे (एसएससी, एचएससी बोर्ड) केली आहे. त्यावर कनिष्ठ महाविद्यालय, उच्च माध्यमिक शाळांकडून निकषांनुसार गुणदान झाले आहे का? याची तपासणी बोर्डाकडून करण्यात येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी शिक्षण विभागाने दहावी, बारावीची अंतिम लेखी परीक्षा रद्द केली. आठवी, नववीचे अंतिम, तर दहावीतील अंतर्गत परीक्षांच्या सरासरी गुणांवर दहावीच्या विद्यार्थ्यांचे आणि दहावी, अकरावीतील अंतिम आणि बारावीतील अंतर्गत गुणांची सरासरी काढून मूल्यांकन करून दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. त्यात नववी आणि अकरावीपर्यंत समान गुणवत्तेच्या वर्गमित्रांमध्ये एकाला ७०, तर दुसऱ्याला ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाल्याने गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे. कसेबसे उत्तीर्ण होणाऱ्या काही जणांना ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित गुणांपेक्षा कमी गुण मिळाले ते नाराज झाले आहेत. कोल्हापूर विभागातील अशा ३० विद्यार्थ्यांनी बोर्डाकडे तक्रार नोंदविली आहे. दहावीतील विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने तक्रार करण्याची सुविधा नव्हती. त्याबाबत या विद्यार्थी, पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पॉइंटर
दहावीचे विद्यार्थी : ५५१४३
उत्तीर्ण झालेले विद्यार्थी : ५५०८८
बारावीचे विद्यार्थी : ४९९७५
उत्तीर्ण झालेले विद्यार्थी : ४९७४१
चौकट
परीक्षा नाही, पुनर्मूल्यांकनही नाही
कोरोनामुळे यावर्षी दहावी, बारावीची अंतिम लेखी परीक्षा झालेली नाही. परीक्षाच झाली नसल्याने पुनर्मूल्यांकनही होणार नाही. श्रेणी सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षा द्यावी लागणार आहे.
चौकट
गुणदानाची तपासणी
मला महाविद्यालयाने अंतर्गत गुण कमी दिले असल्याने अंतिम गुण कमी मिळाले असल्याची तक्रार बारावीच्या ३० विद्यार्थ्यांनी आमच्याकडे ई-मेलद्वारे नोंदविली आहे. त्यावर शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी शासन नियम आणि निकषानुसार गुणदान केले आहे का? याबाबतची तपासणी, पडताळणी आम्ही करून विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे निवारण करीत असल्याचे कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव देवीदास कुलाळ यांनी सांगितले.
250821\25kol_1_25082021_5.jpg
डमी (२५०८२०२१-कोल-डमी १०८३)