मला महाविद्यालयाने कमी गुण दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:26 AM2021-08-26T04:26:39+5:302021-08-26T04:26:39+5:30

विद्यार्थी म्हणतात बारावीची अंतिम लेखी परीक्षा झाली असती, तर मला ९५ टक्क्यांपर्यंत गुण मिळाले असते. मात्र, कोरोनामुळे परीक्षा झाली ...

I was given low marks by the college | मला महाविद्यालयाने कमी गुण दिले

मला महाविद्यालयाने कमी गुण दिले

Next

विद्यार्थी म्हणतात

बारावीची अंतिम लेखी परीक्षा झाली असती, तर मला ९५ टक्क्यांपर्यंत गुण मिळाले असते. मात्र, कोरोनामुळे परीक्षा झाली नाही. सरासरी मूल्यांकनानुसार मला ९० टक्के गुण मिळाले आहेत.

- धवल शिंदे

मला बारावीला ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळतील असे वाटत होते. पण, ८८ टक्के गुण मिळाले आहेत. वर्षभर तयारी करूनही कमी गुण मिळाल्याने थोडे वाईट वाटते.

-किशोरी टिपुगडे

पालक म्हणतात

माझ्या मुलीला दहावीच्या पूर्वपरीक्षेत ९९ टक्के गुण होते. मात्र, अंतिम निकालामध्ये तिला ८५ टक्के गुण मिळाले आहेत. या मूल्यांकनाबाबत तक्रार केली असता शाळेने कोणतीही दखल घेतली नाही. मूल्याकनांचा तिला अकरावी प्रवेशासाठी फटका बसत आहे.

- गुलशन मुजावर

माझ्या मुलाने दहावीसाठी केलेल्या तयारी पाहता त्याला अपेक्षित गुण मिळालेले नाही. पुन्हा परीक्षा देण्याचा आमच्यासमोर पर्याय होता. पण, पुढील शिक्षण महत्त्वाचे असल्याने आम्ही या पर्यायाचा विचार केलेला नाही.

- सचिन तारळेकर

Web Title: I was given low marks by the college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.