कोजिमाशिच्या अध्यक्षपदाचे सोने करीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:31 AM2021-02-27T04:31:51+5:302021-02-27T04:31:51+5:30
: मुरगूड विद्यालयात सत्कार मुरगूड :- मुरगूड विद्यालयाचे संस्कार हेच माझ्या जीवनाची प्रेरणा आहे. या प्रेरणेतून आणि शिक्षण प्रसारक ...
:
मुरगूड विद्यालयात सत्कार
मुरगूड :-
मुरगूड विद्यालयाचे संस्कार हेच माझ्या जीवनाची प्रेरणा आहे. या प्रेरणेतून आणि शिक्षण प्रसारक मंडळाच्या आशीर्वादाने मिळालेल्या अध्यक्षपदाच्या संधीचे सोने करेन, असे उद्गार कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष व शिक्षण प्रसारक मंडळाचे कौन्सिल सदस्य बाळ डेळेकर यांनी केले. मुरगूड विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज येथे त्यांच्या जन्मगावी आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी शिक्षक नेते दादा लाड प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य एस. आर. पाटील होते.
कोल्हापूर जिल्हा शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार प्राचार्य एस. आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
दादा लाड यांनी आपल्या मनोगतात बाळ डेळेकर यांना अध्यक्षपदासाठी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ‘मृत सभासदांच्या कर्जमाफी’ या आदर्श उपक्रमातून संस्थेने देशात लौकिक मिळवला. कोविड काळात संस्था सभासदांच्या पाठीशी खंबीर उभी राहिली. सभासदांच्या सुख-दुःखाशी एकरूप झालेल्या संस्थेचे भविष्य उज्ज्वल आहे.
प्रास्ताविक मुख्याध्यापक एस. आर. पाटील, उपप्राचार्य एस. पी. पाटील, पर्यवेक्षक एस. आर. बेलेकर, प्रा. बी. एस. मडीवाल, मनोहर पाटील, संजय सूर्यवंशी, एस. बी. बोरवडेकर, ए. एच. भोई, अनिल पाटील, फुलसिंग जाधव, पी. एस. पाटील, शशांक कोंडेकर, विराजित घोरपडे, आर. जी. पाटील, वाय. आर. बेलेकर, एम. एस. कांबळे उपस्थित होते. सूत्रसंचालन एम. बी. टेपुगडे यांंनी केले. आभार उपप्राचार्य एस. पी. पाटील यांनी मानले.
फोटो ओळ :-मुरगूड विद्यालय येथे कोजिमाशिचे नूतन अध्यक्ष बाळ डेळेकर यांचा सत्कार प्राचार्य एस. आर. पाटील यांनी केला. यावेळी शिक्षक नेते दादा लाड, एस. वाय. बेलेकर, एस. पी. पाटील आदी उपस्थित होते.