चंदगडकरांच्या ऋणात राहीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:30 AM2021-08-14T04:30:05+5:302021-08-14T04:30:05+5:30

माणगाव : महाबळेश्वरसारखे निसर्गसौंदर्य लाभलेल्या चंदगड तालुक्यात पर्यटनाच्या माध्यमातून अर्थक्रांती निर्माण करण्यास वाव आहे. यासाठी शासन व लोकप्रतिनिधी यांचे ...

I will remain in debt to Chandgadkar | चंदगडकरांच्या ऋणात राहीन

चंदगडकरांच्या ऋणात राहीन

googlenewsNext

माणगाव :

महाबळेश्वरसारखे निसर्गसौंदर्य लाभलेल्या चंदगड तालुक्यात पर्यटनाच्या माध्यमातून अर्थक्रांती निर्माण करण्यास वाव आहे. यासाठी शासन व लोकप्रतिनिधी यांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. हेरे सरंजाम, जातवैधता दाखले यासारखे विविध प्रश्न सोडविताना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. येथील नागरिक जरी रागीस्ट वाटत असली तरी ती मनातून फणसासारखी गोड आहेत.

त्यामुळे चंदगडचे निसर्गसौंदर्य आणि जनतेचे प्रेम आयुष्यभर स्मरणात राहील, असे प्रतिपादन गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी केले.

चंदगड येथे आयोजित 'चंदगड भूषण' पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी मंत्री भरमूअण्णा पाटील होते. यावेळी तहसीलदार विनोद रणावरे, पो. नि. बी. ए. तळेकर, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, मुख्याधिकारी अभिजित सूर्यवंशी उपस्थित होते.

प्रारंभी अ‍ॅड. संतोष मळवीकर यांनी प्रास्ताविकात पांगारकर यांनी कामाच्या माध्यमातून चंदगडच्या जनतेमध्ये वेगळे स्थान निर्माण केल्यानेच त्यांना चंदगड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे सांगितले.

भरमूअण्णा पाटील म्हणाले, चंदगड तालुका हा जिल्ह्याच्या राजकीय दृष्टिकोनातून मागास आहे. मात्र, येथील नागरिक, भौगोलिक परिस्थिती मागास नाही. प्रांताधिकारी यासारखे शासकीय अधिकारी यांनी यापुढे आपल्यासारखे सहकार्य दाखवले तर तालुका प्रति महाबळेश्वर म्हणून विकसित होईल.

प्रा. सुनील शिंत्रे, मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगले यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे यांना जि. प.चा 'प्र. के. अत्रे' पुरस्कार मिळाल्याबदल पांगारकर यांच्याहस्ते सत्कार झाला.

कार्यक्रमास संजय साबळे, नायब तहसीलदार संजय राजगोळे, अशोक कोळी, तानाजी गडकरी, संज्योती मळवीकर, शांता जाधव, संज्योती मळवीकर, शारदा घोरपडे, पांडुरंग बेनके, विष्णू गावडे, विलास पाटील, बसवंत अडकुरकर, रामभाऊ पारसे, राजू पाटील, बापू शिरगावकर, अनिल गावडे आदी उपस्थित होते. सदानंद पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: I will remain in debt to Chandgadkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.