मी पकादादाकडे राहणार... मतिमंद मुलाचा चौकशीला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:23 AM2021-03-06T04:23:59+5:302021-03-06T04:23:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘तू कुठे राहतो..कुणाकडे राहणार..तुला जेवायला कोण देतं..’ या जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या चौकशीला प्रतिसाद ...

I will stay with Pakadada ... The mentally retarded boy responds to the inquiry | मी पकादादाकडे राहणार... मतिमंद मुलाचा चौकशीला प्रतिसाद

मी पकादादाकडे राहणार... मतिमंद मुलाचा चौकशीला प्रतिसाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘तू कुठे राहतो..कुणाकडे राहणार..तुला जेवायला कोण देतं..’ या जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या चौकशीला प्रतिसाद देत ‘..दीदी मला कपडे देते..जेवण देते..मी पकादादाकडे राहणार’ असल्याचे निरागस उत्तर प्रशांत पाटील या मतिमंद मुलाने शुक्रवारी दिले. त्याचा चुलतभाऊ प्रकाश बापूसो पाटील यांना प्रशांतच्या पालकत्वाची जबाबदारी देण्यात आली.. मनोरुग्ण या प्रवर्गासाठी पालकत्वाची तरतूद नसल्याने त्यांचे पालकत्व हे न्यायालयामार्फत घेण्यात यावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

१८ वर्षांवरील मतिमंद, बहुविकलांग, मेंदूचा पक्षाघात, स्वमग्नता मुलांच्या पालकत्वासाठी राष्ट्रीय न्यास अधिनियम १९९९ची अंमलबजावणी जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. करवीर तालुक्यातील वाकरे येथील प्रशांत शिवाजीराव पाटील याच्या पालकत्व प्रमाणपत्रानुसार आलेल्या तक्रारीच्या आनुषंगाने सुनावणी घेण्यात आली. यावेळी प्रकाश पाटील, कृष्णात पाटील आणि चंद्रकांत पाटील या तिघांचे म्हणणे तसेच प्रत्यक्ष प्रशांत पाटील याचे म्हणणे ऐकण्यात आले. विचारलेल्या सर्व प्रश्नांना तितक्याच सहजतेने उत्तरे देत त्याने आपण सायकल आणि स्कूटी चालवत असल्याचेही सांगितले. शिवाय उपस्थिती नोंदणी वहीवर सहीदेखील केली.

जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी विषयवाचन केले. घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन केलेल्या निरीक्षणाची माहिती वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या साधना कांबळे यांनी मांडली. यानंतर प्रशांतचे पालकत्व प्रकाश पाटील यांना देण्यात आले

यावेळी स्वप्नील विकास कदम याचे पालकत्व काका सुरेश झांबरे, मुनवार नरूला सय्यद याचे पालकत्व भाऊ अर्शद सय्यद, साहील मनसूर गोलंदाज याचे पालकत्व आई शहनाज गोलंदाज आणि उज्ज्वला नारायण निर्मळे हिचे पालकत्व भाऊ संतोष यांच्याकडे देण्यास मंजुरी देण्यात आली.

---

फोटो नं ०५०३२०२१-कोल-दिव्यांग पालक बैठक

ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत प्रशांत पाटील या दिव्यांग मुलाचे पालकत्व चुलतभाऊ प्रकाश पाटील यांच्याकडे देण्यात आले. यावेळी साधना कांबळे, दीपक घाटे, अतुल जोशी, प्रशांत सातपुते उपस्थित होते.

--

Web Title: I will stay with Pakadada ... The mentally retarded boy responds to the inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.