आई-बाबांची माया हरवतेय
By admin | Published: December 17, 2015 12:49 AM2015-12-17T00:49:44+5:302015-12-17T01:19:23+5:30
सिंधुताई सपकाळ : सुशीलादेवी आबिटकर हेल्थ फौंडेशनचे उद्घाटन
गारगोटी : भारतीय संस्कृतीची पाया असलेली आई-बाबा आणि ताईंची माया आजच्या धावत्या जगात हरवत चालली असून आमदार प्रकाश आबिटकर यांनी आर्इंच्या नावाने सुरु केलेले रुग्णसेवेचे काम निराधार गोरगरिबांसाठी आधारवड ठरेल, असा विश्वास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केला. गारगोटी येथे स्वर्गीय सुशिलादेवी आबिटकर हेल्थ फौंडेशनच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दिनकराव जाधव होते.
आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, भुदरगड, आजरा, राधानगरी तालुक्यांतील जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन देणे हा या फौंडेशनचा मुख्य हेतू असून, २0१६ मध्ये जिल्ह्यासह राज्यातील तज्ज्ञ डॉक्टर्सना पाचारण करून रुग्णांना मार्गदर्शनासह उपचार करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
माजी आमदार दिनकरराव जाधव म्हणाले, प्रकाश आबिटकर यांनी सुरुवातीपासूनच राजकारणापेक्षा सामाजिक कार्य करण्यावर विशेष भर दिल्याने जनतेने त्यांना आमदार
केले. यावेळी ‘भोगावती’चे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. मारुती जाधव, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बी. एस. देसाई, डॉ. के. ए. मोमीन यांनी मनोगत व्यक्त केली.
ज्येष्ठ नेते वसंतराव देसाई, भाई आनंदराव आबिटकर, सरपंच गीता मोरे, उपसरपंच अरुण शिंदे, आजरा कारखान्याचे माजी अध्यक्ष अशोक चराटी, श्रीपतराव देसाई पेरणोली, जयसिंग खामकर, माजी उपाध्यक्ष ‘भोगावती’चे विश्वनाथ पाटील, हिंदुराव चौगले, पोलीस निरीक्षक बन्सी बारवकर, नंदकुमार ढेंगे, कल्याणराव निकम, दत्ताजीराव उगले, संदीप वरंडेकर, महादेव परीट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक धनाजी खोत यांनी, सूत्रसंचालन चंद्रशेखर कांबळे यांनी तर आभार प्रा. आबिटकर यांनी मानले. (प्रतिनिधी)