इचलकरंजीत राष्ट्रवादीच्या गटबाजीचे दर्शन

By admin | Published: February 3, 2015 09:47 PM2015-02-03T21:47:50+5:302015-02-03T23:53:32+5:30

बेबनाव : एकाच आंदोलनासाठी दोन वेगवेगळी निवेदने सादर

Ichalkaranjeet's stereotype philosophy | इचलकरंजीत राष्ट्रवादीच्या गटबाजीचे दर्शन

इचलकरंजीत राष्ट्रवादीच्या गटबाजीचे दर्शन

Next

इचलकरंजी : केसरी शिधापत्रिकांवर पुन्हा धान्य वाटप सुरू करण्याबरोबरच रॉकेलच्या कोट्यात वाढ करावी, या एकाच मागणीसाठी निवेदन देताना येथील राष्ट्रवादी कॉँग्रेसने गटबाजीचे दर्शन घडवले. आज, मंगळवारी कारंडे व जांभळे गटाने पुरवठा अधिकाऱ्यांना एकाच आशयाची दोन वेगवेगळी निवेदने दिली.अन्नसुरक्षा योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील व अंत्योदय या कुटुंबीयांबरोबरीने केसरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना रास्त भावाचे धान्य मिळत असे; पण नव्या भाजपप्रणीत सरकारने केसरी शिधापत्रिकांवरील धान्य वितरण बंद केले. त्याचा फटका राज्यातील एक कोटी ७७ लाख नागरिकांना बसला असल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून राज्यभर आंदोलन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी प्रांताधिकाऱ्यांना निवेदने देण्यात येणार होती; पण प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे या कार्यालयात उपलब्ध नसल्याने दोन्ही गटाने वेगवेगळे येऊन पुरवठा निरीक्षण अधिकारी के. बी. देसाई यांना निवेदन दिले. माजी आमदार जांभळे गटाकडून आलेल्या शिष्टमंडळामध्ये इचलकरंजी विधानसभा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र माने, शहर युवक अध्यक्ष नितीन जांभळे, नगरसेवक महेश ठोके, बंडोपंत मुसळे, विनय महाजन, मीना मोरे, आदींचा, तर कारंडे गटाकडून आलेल्या शिष्टमंडळामध्ये प्रदेश चिटणीस मदन कारंडे, शहर अध्यक्ष विठ्ठल चोपडे, नगरसेविका माधुरी चव्हाण, सचिन हुक्किरे, नितीन कोकणे, आदींचा समावेश होता. तसेच जांभळे गटाकडून पुरवठा अधिकारी कार्यालयासमोर शासनाचा निषेध करणारी घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. अशाप्रकारे पक्षाचा आदेश असूनसुद्धा आणि एकाच आशयाच्या निवेदनासाठी वेगळेपण दाखविल्यामुळे शहरातील राष्ट्रवादी कॉँग्रेसने आपले राजकीय दिवाळे उघड केल्याची चर्चा शहरात होती. (प्रतिनिधी)

Web Title: Ichalkaranjeet's stereotype philosophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.