इचलकरंजीत १०५ पॉझिटिव्ह; चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:19 AM2021-05-03T04:19:39+5:302021-05-03T04:19:39+5:30

इचलकरंजी : शहरात शनिवारी (दि.१) व रविवारी या दोन दिवसांत १०५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला, तर चौघांचा मृत्यू ...

Ichalkaranji 105 positive; Death of four | इचलकरंजीत १०५ पॉझिटिव्ह; चौघांचा मृत्यू

इचलकरंजीत १०५ पॉझिटिव्ह; चौघांचा मृत्यू

Next

इचलकरंजी : शहरात शनिवारी (दि.१) व रविवारी या दोन दिवसांत १०५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला, तर चौघांचा मृत्यू झाला. मृत झालेल्यांमध्ये खंजिरे मळ्याजवळील ५२ वर्षीय पुरुष, प्रियदर्शनी कॉलनीजवळील ७५ वर्षीय वृद्ध, जवाहरनगरमधील ७६ वर्षीय वृद्ध व विकासनगरमधील ३५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

शनिवारी आवाडेनगर, जवाहरनगर, शहापूर, लायकर गल्ली, कामगार चाळ, सांगली नाका, गणेशनगर, यशवंत कॉलनी, करांडे मळा, सुतार मळा, लंगोटे मळा, गावभाग, गोकुळ चौक, शांतीनगर, दाते मळा, विकासनगर, जगदाळे मळा, संत मळा, वर्धमान चौक, कलानगर, आसरानगर, लिंबू चौक, कापड मार्केट, बालाजीनगर, चांदणी चौक, भारतमाता हौसिंग सोसायटी व तीन बत्ती चौक, तसेच रविवारी कामगार चाळ, जवाहरनगर, दत्तनगर, शहापूर, लंगोटे मळा, वेताळ पेठ, मणेरे हायस्कूलजवळ, धान्य ओळ, सावली सोसायटी, स्टेशन रोड, यशवंत कॉलनी, मंगलधामजवळ, कोल्हापूर नाका, भोनेमाळ, कृष्णानगर, सहकारनगर, आमराई रोड, गावभाग, सांगली नाका, भिडे हॉस्पिटलजवळ, जुना चंदूर रोड, संत मळा, संग्राम चौक, गोकुळ चौक, आंबेडकरनगर, कलानगर, तीन बत्ती चौक, खंजिरे इंडस्ट्रियलजवळ व शेळके मळा परिसरातील व्यक्तींचा समावेश आहे.

आतापर्यंत पाच हजार २४० जणांना लागण झाली असून, चार हजार ४३१ बरे झाले आहेत. ५८२ जण उपचार घेत असून, मृत्यूसंख्या २२७ वर पोहोचली आहे.

Web Title: Ichalkaranji 105 positive; Death of four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.