इचलकरंजीत ४१ पॉझिटिव्ह ; दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:32 AM2021-06-09T04:32:01+5:302021-06-09T04:32:01+5:30
इचलकरंजी : शहरात २९ भागांतील ४१ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान गणेशनगर येथील ५३ वर्षीय पुरुष व जवाहरनगर ...
इचलकरंजी : शहरात २९ भागांतील ४१ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान गणेशनगर येथील ५३ वर्षीय पुरुष व जवाहरनगर येथील ४६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये श्रीपादनगर ४, सांगली नाका, इंडस्ट्रियल इस्टेटजवळ, यशवंत कॉलनी प्रत्येकी ३, रिंग रोड, आसरानगर, विक्रमनगर प्रत्येकी २, शेळके मळा, नदीवेस नाका, मोठे तळे, बोहरा मार्केटजवळ, लायकर गल्ली, झेंडा चौक, अष्टविनायक गल्ली, खंजिरे मळा, मंगळवार पेठ, लालनगर, नारायणनगर, कुष्ठरोग वसाहत, राधाकृष्ण कॉलनी, तांबे मळा, बंडगर माळ, लायकर मळा, विवेकानंद कॉलनी, श्रद्धा कॉलनी, गांधी हॉस्पिटलजवळ, जवाहरनगर, दत्तनगर व शहापूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत सात हजार १०३ जणांना लागण झाली आहे. सहा हजार २५९ जण बरे झाले असून, ४८६ जणांवर उपचार सुरू आहेत. मृत्यूसंख्या ३५८वर पोहोचली आहे.