इचलकरंजीत प्रशासनाने कडक भूमिका घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:26 AM2021-04-07T04:26:41+5:302021-04-07T04:26:41+5:30

नगरपालिकेत संनियंत्रण समितीची बैठक लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याने रुग्णांची संख्याही झपाट्याने ...

The Ichalkaranji administration should take a strict stand | इचलकरंजीत प्रशासनाने कडक भूमिका घ्यावी

इचलकरंजीत प्रशासनाने कडक भूमिका घ्यावी

Next

नगरपालिकेत संनियंत्रण समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याने रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. नागरिकांची कोरोना तपासणी केल्यानंतर एकूण तपासणीच्या ११ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. ही बाब खूपच गंभीर आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार प्रशासनाने समन्वयातून कडक भूमिका घ्यावी. लसीकरणासाठी जागरुकता निर्माण करावी. त्यासाठी आपण दहा रिक्षा देऊ, असे प्रतिपादन आमदार प्रकाश आवाडे यांनी केले.

नगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी, पुढील दोन महिने नागरिकांना काळजी घेण्याची आवश्यकता आहे. शहरातील लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे. पहिल्या लाटेपासून शहरवासीयांनी बोध घेणे गरजेचे होते; पण तसे होताना दिसत नाही. त्यामुळे आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन केले. तसेच नगरपालिका व पोलीस प्रशासनाने नियमांचे पालन करण्यासाठी कडक अंमलबजावणी करावी.

आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी, इचलकरंजी शहर हे दाट लोकवस्तीचे शहर आहे. गेल्या ४५ दिवसांमध्ये २०५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत. सध्याची पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही पाच पट असून, शहराला धोक्याची घंटा आहे. त्यामुळे त्रिसूत्रीचे नियम पाळण्याचे आवाहन केले. आयजीएमचे डॉ. एम. ए. महाडिक यांनी आयजीएममधील सद्यपरिस्थितीची माहिती दिली.

बैठकीत नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, नगरसेवक सागर चाळके, राहुल खंजिरे, सुनील पाटील आदींनी मत मांडले. यावेळी पालिकेचे सभापती, अधिकारी, तसेच गावभाग, शिवाजीनगर, शहापूर व शहर वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी उपस्थित होते. प्रभारी मुख्याधिकारी शरद पाटील यांनी आभार मानले.

चौकटी

शहरातील सर्व यंत्रमाग सुरू राहणार

इचलकरंजी हे औद्योगिक शहर असून, येथील लोकांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन यंत्रमाग व्यवसाय आहे. शहराचे अर्थचक्र हे या व्यवसायावरच चालते. त्यामुळे यंत्रमाग व्यवसाय कोरोनाचे सर्व नियम पाळून सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठी यंत्रमागधारकांनी कर्मचाऱ्यांचे लसीकरण करणे. लस घेतली नसेल, तर निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र जवळ बाळगावे व एखादा पॉझिटिव्ह आढळल्यास त्याची जबाबदारी घेणे बंधनकारक राहणार आहे.

कडक कारवाई करणार

अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांनीही नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच पुन्हा तपासणी नाके सुरू करणार असल्याचे सांगितले.

फोटो ओळी

०६०४२०२१-आयसीएच-०४

इचलकरंजी संनियंत्रण समितीच्या बैठकीत आमदार प्रकाश आवाडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, नगराध्यक्षा अलका स्वामी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपअधीक्षक बाबूराव महामुनी आदी उपस्थित होते.

Web Title: The Ichalkaranji administration should take a strict stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.