इचलकरंजीत पुन्हा बाजार रस्त्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:33 AM2021-02-27T04:33:16+5:302021-02-27T04:33:16+5:30

इचलकरंजी : शहरात दि. २२ फेब्रुवारी ते ८ मार्चपर्यंत प्रायोगिक वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर आठवडी बाजाराच्या दिवशी विक्रेत्यांना ...

Ichalkaranji again on the market road | इचलकरंजीत पुन्हा बाजार रस्त्यावरच

इचलकरंजीत पुन्हा बाजार रस्त्यावरच

Next

इचलकरंजी : शहरात दि. २२ फेब्रुवारी ते ८ मार्चपर्यंत प्रायोगिक वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर आठवडी बाजाराच्या दिवशी विक्रेत्यांना रस्त्यावर बसू देवू नये. तसेच विक्रेते व ग्राहक यांची वाहनेही नेमून दिलेल्या जागेवरच लावावीत, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आराखड्यात दिल्या आहेत. परंतु त्याच्या अंमलबजावणीचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र शुक्रवारच्या बाजारात दिसले. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेचेही गांभीर्य नसल्याचे दिसत आहे.

शहरातील उडालेला वाहतुकीचा बोजवारा सुरळीत करण्यासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शहरात २२ फेब्रुवारी ते ८ मार्च या १५ दिवसांकरिता वाहतुकीचे नियम निर्देश लागू केले. त्यामध्ये सिग्नल व्यवस्था, एकेरी मार्ग, पार्किंग झोन, नो पार्किंग झोन अशा विविध बाबींसह शहरातील आठवडी बाजारासंदर्भात स्वतंत्र सूचना देण्यात आली होती. त्याचबरोबर वाहतुकीला अडथळा होईल असे हातगाडे, रिक्षा व इतर वाहने लावू नयेत, अशाही सूचना होत्या. परंतु शुक्रवारी भरलेल्या थोरात चौक व विकली मार्केट येथील बाजारात पाहणी केली असता कोणत्याही सूचनांचे पालन केल्याचे आढळले नाही.

नेहमीप्रमाणेच रस्त्यावर बाजार भरला होता. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून, योग्य नियोजन केल्यास त्यामध्ये सुधारणा होईल; अन्यथा वाहतुकीचा अडथळा नित्याचाच बनून राहील. 'लोकमत' नेही याबाबत वेळोवेळी आवाज उठविला आहे. त्याची दखल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतली. आता अंमलबजावणी कधी होणार, याकडे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया

पहिल्या टप्प्यात थोरात चौक या मार्गावरील लक्झरी बस वगळता इतर संपूर्ण अवजड वाहतूक बंद केली आहे. विक्रेत्यांना स्वच्छता दिल्या आहेत. नगरपालिकेकडे पार्किंगसाठी जागा मागितली आहे. त्याचबरोबर विकली मार्केट भागातील इतर दोन रस्त्यांवर भरणारा बाजार हलविला आहे. पुढील आठवड्यापासून उर्वरित बाजाराच्या बैठकीचे व पार्किंगचे नियोजन होईल.

नंदकुमार मोरे, इचलकरंजी शहर वाहतूक शाखाप्रमुख

फोटो ओळी

२२०२२०२१-आयसीएच-०६

इचलकरंजीतील थोरात चौकात शुक्रवारी पुन्हा रस्त्यावर बाजार भरला.

२२०२२०२१-आयसीएच-०७

विकली मार्केट परिसरातही शुक्रवारी रस्त्यावर बाजार भरला होता.

सर्व छाया-उत्तम पाटील

Web Title: Ichalkaranji again on the market road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.