इचलकरंजीत ३० रुपयांसाठी खून, डोक्यात घातला दगड; आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 01:48 PM2022-01-07T13:48:31+5:302022-01-07T13:51:18+5:30

सचिनच्या मित्राने खून झालेल्या भिकाऱ्याकडे २० रुपये मागितले. त्याला मामूने २० रुपये दिले. त्यामुळे सचिनला राग आला. त्या रागातून त्याने सिमेंटचा दगड मामूच्या डोक्यात घालून त्याचा खून केला.

Ichalkaranji beggar murdered by throwing a stone at his head | इचलकरंजीत ३० रुपयांसाठी खून, डोक्यात घातला दगड; आरोपी अटकेत

इचलकरंजीत ३० रुपयांसाठी खून, डोक्यात घातला दगड; आरोपी अटकेत

googlenewsNext

इचलकरंजी : दारू पिण्यासाठी ३० रुपये दिले नाहीत, म्हणून येथील जवाहरनगरमधील एका तरुणाने फिरस्त्या भिकाऱ्याचा डोक्यात दगड घालून खून केला. मामू (पूर्ण नाव समजू शकले नाही) असे त्या फिरस्त्याचे नाव आहे. याप्रकरणी सचिन लिंगाप्पा पाटील (वय २७, रा. कोरवी गल्ली, जवाहरनगर इचलकरंजी) याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, डेक्कन चौक परिसरात मामू नामक अनोळखी व्यक्ती फिरस्ता म्हणून वावरत होता. तो भीक मागून उदरनिर्वाह करीत होता. गुरूवारी (दि.६) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास सचिन पाटील याने मामूकडे दारू पिण्यासाठी ३० रुपये मागितले. त्याला मामूने नकार दिला.

त्यानंतर सचिनचा मित्र दंडोजी याने २० रुपये मागितले. त्याला मामूने २० रुपये दिले. त्यामुळे सचिनला राग आला. त्या रागातून त्याने सिमेंटचा दगड मामूच्या डोक्यात घालून त्याचा खून केला. ही माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच संशयित सचिन याला अटक केली.

Web Title: Ichalkaranji beggar murdered by throwing a stone at his head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.