इचलकरंजी संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:46 AM2021-03-13T04:46:04+5:302021-03-13T04:46:04+5:30

इचलकरंजी : मराठी भाषा दिनानिमित्त 'आलोरगान' हे नाटक आणि 'भुताचा जन्म' हा एकपात्री कार्यक्रम आयोजित केला आहे. सोमवारी (दि.१५) ...

Ichalkaranji Brief News | इचलकरंजी संक्षिप्त बातम्या

इचलकरंजी संक्षिप्त बातम्या

googlenewsNext

इचलकरंजी : मराठी भाषा दिनानिमित्त 'आलोरगान' हे नाटक आणि 'भुताचा जन्म' हा एकपात्री कार्यक्रम आयोजित केला आहे. सोमवारी (दि.१५) सायंकाळी साडेसहा वाजता येथील रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्रात हा कार्यक्रम होणार आहे. तरी साहित्य व नाट्यरसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब सेंट्रल व मनोरंजन मंडळ युवक विभागाने केले आहे.

श्रेयांस चौगुलेला कास्यपदक

इचलकरंजी : आग्रा (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या वरिष्ठ गटाच्या ६०० किलो गटातून राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेत येथील व्यंकटेश महाविद्यालयातील विद्यार्थी श्रेयांस मोहन चौगुले याने कास्यपदक मिळविले. स्पर्धेसाठी सोलापूर, बुलढाणा, मुंबई येथून खेळाडू आले होते. श्रेयांसला बिभीषण पाटील, माधवी पाटील, दया कावरे, अक्षय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो ओळी

१२०३२०२१-आयसीएच-०१ - श्रेयांस चौगुले

अद्ययावत साऊंड सिस्टीम प्रदान

इंगळी : येथील विठ्ठल मंदिरासाठी जि. प. सदस्या स्मिता शेंडुरे यांनी अद्ययावत साऊंड सिस्टीम दिली. येथे १८ मार्चपासून मानकरी व सेवेकरांच्या उपस्थितीत अखंड हरिनाम सप्ताह होत आहे. यानिमित्त ही साऊंड सिस्टीम देण्यात आली. यावेळी राहुल आंबी, प्रवीण लोहार, प्रवीण रांगोळे आदी उपस्थित होते.

Web Title: Ichalkaranji Brief News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.