इचलकरंजी संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:25 AM2021-05-08T04:25:54+5:302021-05-08T04:25:54+5:30
इचलकरंजी : रोटरी क्लब सेंट्रल व रोटरी क्लब टेक्स्टाईल सिटीच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कोविड-१९ लसीकरण केंद्राचे उद्घाटन आमदार प्रकाश ...
इचलकरंजी : रोटरी क्लब सेंट्रल व रोटरी क्लब टेक्स्टाईल सिटीच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कोविड-१९ लसीकरण केंद्राचे उद्घाटन आमदार प्रकाश आवाडे व प्रांतपाल संग्राम पाटील (कोल्हापूर) यांनी केले. येथील रोटरी श्री. दगडुलाल मर्दा मानव सेवा केंद्रात हे लसीकरण सुरू केले असून, उपलब्धतेनुसार नागरिकांचे मोफत लसीकरण केले जाणार आहे. यावेळी मनीष मुनोत, संजयसिंह गायकवाड, विमलकुमार बंब, प्रभा मर्दा, राजेंद्र जैन, डॉ. शेखर बेनाडे, आदी उपस्थित होते.
नवीन मोठी गटार करावी
कबनूर : येथील डेक्कन रोडवरील मुख्य चौक ते एकता ग्रुप चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या गटारी नादुरुस्त झाल्या आहेत. त्यातून पाण्याचा निचरा होत नसल्याने डासांचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी ग्रामपंचायतीने नवीन मोठी गटार करावी, अशी मागणी होत आहे.
प्रबोधन व्याख्यानमाला स्थगित
इचलकरंजी : येथील मनोरंजन मंडळाच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे आयोजित केली जाणारी प्रबोधन व्याख्यानमाला कोविड-१९ परिस्थितीमुळे स्थगित केली आहे. परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर सदरचा उपक्रम घेण्याचे नियोजन केले आहे. तरी नागरिकांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन केले आहे.
खासदार मानेंकडून आढावा बैठक
इंगळी : येथे वाढत्या कोरोनाबाबत खासदार धैर्यशील माने यांनी आढावा बैठक घेतली. हा संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीकडून होत असलेल्या उपाययोजनांबाबत त्यांनी माहिती घेतली. तसेच शासन नियमांचे पालन करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. बैठकीस अप्पर तहसीलदार शरद पाटील, मुरलीधर जाधव, साताप्पा भवान, पं. स. सदस्य वैजयंती आंबी आदी उपस्थित होते.