इचलकरंजी संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:17 AM2021-07-03T04:17:13+5:302021-07-03T04:17:13+5:30
व्यंकटेश महाविद्यालयास भेट इचलकरंजी : व्यंकटेश महाविद्यालयास महाराष्ट्र शासनाकडून बी.कॉम. (आयटी) या अभ्यासक्रमास मान्यता मिळाली आहे. या अभ्यासक्रमाच्या तपासणीसाठी ...
व्यंकटेश महाविद्यालयास भेट
इचलकरंजी : व्यंकटेश महाविद्यालयास महाराष्ट्र शासनाकडून बी.कॉम. (आयटी) या अभ्यासक्रमास मान्यता मिळाली आहे. या अभ्यासक्रमाच्या तपासणीसाठी विभागीय सहसंचालक डॉ. सोनाली रोडे यांनी भेट दिली. त्यांनी महाविद्यालयातील संगणक, लॅब, कार्यालय, ग्रंथालय, स्टाफ रूम यांना प्रत्यक्ष भेट देऊन समाधान व्यक्त केले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष हरीष बोहरा, सचिव बी. एस. वडिंगे, प्राचार्य डॉ. व्ही. ए. माने आदी उपस्थित होते.
आठवडी बाजार भरविण्यास परवानगी मिळावी
कबनूर : येथे आठवडी बाजार भरविण्यास परवानगी मिळावी, अशा मागणीचे निवेदन दत्तनगर परिसरातील भाजी व फळविक्रेत्यांनी सरपंच शोभा पोवार यांना दिले. निवेदनात, गेल्या तीन महिन्यांपासून बाजार बंद असल्याने विक्रेत्यांचे नुकसान होत आहे. सर्व विक्रेत्यांनी अॅँटिजन चाचणी केली असून, शासनाचे नियम पाळून बाजार भरण्यास परवानगी मिळावी, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात गणेश रेणके, अरविंद झा, आप्पासाहेब पाटील, अंजना गाडेकर, संगीता बाबर आदींचा समावेश होता.