इचलकरंजी संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:35 AM2021-02-26T04:35:40+5:302021-02-26T04:35:40+5:30
इचलकरंजी : गावभागातील गोल्डन फ्रेंड्स क्लबच्यावतीने रामजानकी हॉल येथे महारक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात १५० दात्यांनी रक्तदान केले. शिबिराचा ...
इचलकरंजी : गावभागातील गोल्डन फ्रेंड्स क्लबच्यावतीने रामजानकी हॉल येथे महारक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात १५० दात्यांनी रक्तदान केले. शिबिराचा प्रारंभ आमदार प्रकाश आवाडे यांनी केला. विशेष म्हणजे या शिबिरात महिलांसह तृतीयपंथीयांनीही रक्तदान केले. यावेळी जि. प. सदस्य राहुल आवाडे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, मौसमी आवाडे, प्रकाश दत्तवाडे, राजेंद्र बचाटे, तौफिक जमादार, अमित माळकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
मुख्याध्यापिका गोंदकर यांना पुरस्कार
२५०२२०२१-आयसीएच-०१ सुप्रिया गोंदकर
इचलकरंजी : येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स् हायस्कूल-ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सुप्रिया सुरेश गोंदकर यांना ‘विशेष शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार कर्नाटक राज्यातील नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फौंडेशन आणि हेल्थ नेचर डेव्हलपमेंट सोसायटीच्यावतीने देण्यात येणार आहे. २८ मार्चला बेळगाव येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असून, सोहळ्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील भारतीय सैन्यदलातील अधिकारी, सिनेकलाकार, शिक्षण खात्यातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मुख्याध्यापिका गोंदकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात आणि नगराध्यक्षा म्हणून केलेली सामाजिक सेवा याची दखल घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे.
रोटरी इंटरनॅशनलचा वर्धापनदिन साजरा
इचलकरंजी : रोटरी इंटरनॅशनलचा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा होऊ नये याकरिता सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष अभय यळरुटे, सचिव दीपक निंगुडगेकर, संग्रामसिंह गायकवाड, विमल बंब, रवी रांदड, अखिल बोहरा, मेघा यळरुटे, वैभवी निंगुडगेकर आदी उपस्थित होते.