इचलकरंजी संक्षिप्त बातम्या दोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:23 AM2021-03-20T04:23:26+5:302021-03-20T04:23:26+5:30
इचलकरंजी : कोविड-१९ काळातील अनुदान कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांना जाहीर झाले. त्याचा लाभ काही कामगारांना अजूनही मिळाला नाही. तसेच ...
इचलकरंजी : कोविड-१९ काळातील अनुदान कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांना जाहीर झाले. त्याचा लाभ काही कामगारांना अजूनही मिळाला नाही. तसेच कामगारांच्या वारसांना पेन्शन मिळावे. तसेच मागील वर्षाचे बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी, अशा मागणीचे निवेदन लालसेना बांधकाम कामगार सेनेने सहायक कामगार आयुक्त कार्यालयात दिले. शिष्टमंडळात हणमंत लोहार, मारुती आजगेकर, महेश लोहार, शशिकांत सदलगे, अनिल सामंत, अशोक जगताप आदींचा समावेश होता.
महिलेचा विनयभंग
इचलकरंजी : येथील साईट नं. १०२ मध्ये एका महिलेच्या दारात जाऊन अश्लील भाषा वापरून शिवीगाळ करत एकाने विनयभंग केला. याबाबत गावभाग पोलीस ठाण्यात तुषार संजय साठे (रा. साइट नं. १०२) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार शुक्रवारी सकाळी घडला. तुषार याने पोलीस माझे काही वाकडे करू शकत नाहीत, तुला पोलिसांत तक्रार द्यायची असेल, तर दे, अशी धमकी दिल्याचेही पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.