Child marriage in kolhapur: साखरपुडा म्हणून बालविवाह उरकला, पोलिसांचीच दिशाभूल; इचलकरंजीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 01:10 PM2022-05-17T13:10:12+5:302022-05-17T13:17:31+5:30

मुलीचे समुपदेशन केल्यानंतर तिने रविवारी आपला बालविवाह झाल्याचे सांगितले

Ichalkaranji committed child marriage as a engment, misleading the police | Child marriage in kolhapur: साखरपुडा म्हणून बालविवाह उरकला, पोलिसांचीच दिशाभूल; इचलकरंजीतील घटना

Child marriage in kolhapur: साखरपुडा म्हणून बालविवाह उरकला, पोलिसांचीच दिशाभूल; इचलकरंजीतील घटना

googlenewsNext

कोल्हापूर : इचलकरंजी येथील १७ वर्षीय मुलीचा रविवारी सायंकाळी साखरपुडा म्हणून बालविवाह उरकण्यात आला. पोलीस घटनास्थळी गेल्यानंतर मुला-मुलीच्या पालकांनी आम्ही मुलीचा फक्त साखरपुडा करणार होतो, तोदेखील करणार नाही, असे खोटे सांगितले. मात्र, सोमवारी मुलीला बालकल्याण समितीसमोर सादर केल्यानंतर तिने आपला बालविवाह झाल्याचे सांगितले.

इचलकरंजी येथील १७ वर्षे ६ महिने वय असलेली ही मुलगी आपल्या आजीसोबत राहत होती. आई परगावी असते, वडील नाहीत. या मुलीचे रविवारी लग्न होणार असल्याची याची माहिती शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांना समजली. त्यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती पाटील यांना कळविले. सायंकाळी ६ वाजता पोलीस घटनास्थळी गेले त्याआधीच कुटुंबीयांना याची कल्पना आली होती. त्यांनी आधीच मुलीचे लग्न उरकले.

पोलीस आल्यावर त्यांना आम्ही मुलीचा साखरपुडा करणार होतो, पण आता तुम्ही बालविवाह कायद्याची माहिती दिल्याने साखरपुडादेखील करणार नाही, असे खोटे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून पोलीस निघून गेले. सोमवारी सकाळी मुलीला पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले. तेथे समुपदेशनासाठी आलेले अवनी जागर प्रकल्पाचे समन्वयक प्रमोद पाटील यांनी कायद्याची माहिती देऊन मुलीला, मुलाला व पालकांना बालकल्याण समितीसमोर सादर केले.

येथे मुलीचे समुपदेशन केल्यानंतर तिने रविवारी आपला बालविवाह झाल्याचे सांगितले. बालकल्याण समितीच्या वतीने याबाबतचा अहवाल बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना पाठवून पालकांवर गुन्हा नोंद करण्याची शिफारस करण्यात येईल, त्यानुसार पुढील कार्यवाही होईल.

मुलगी आजीच्या ताब्यात

मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत तिला सासरी पाठविले जाणार नाही, असे तिची आजी व आईकडून लिहून घेण्यात आले आहे. तसेच दर महिन्याला तिला बालकल्याण समितीसमोर हजर करावे लागणार आहे. हे बंधपत्र लिहून घेतल्यानंतर मुलीला आजीच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: Ichalkaranji committed child marriage as a engment, misleading the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.