इचलकरंजी महत्त्वाचे संक्षिप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:25 AM2021-04-02T04:25:57+5:302021-04-02T04:25:57+5:30
इचलकरंजी : शहरात गुरुवारी विविध दहा ठिकाणी तेराजणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये सांगली रोड १, कलानगर १, नाकोडानगर ...
इचलकरंजी : शहरात गुरुवारी विविध दहा ठिकाणी तेराजणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये सांगली रोड १, कलानगर १, नाकोडानगर १, मुक्त सैनिक सोसायटी १, जवाहरनगर १, श्रीरामनगर ३, तांबे माळ २, रॉयल गंगा कॉम्प्लेक्स १, आवाडेनगर १ व थोरात चौक १ अशा तेराजणांचा समावेश आहे. आतापर्यंत चार हजार १८४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, तीन हजार ९०४ जणांनी मात केली आहे. ८४ जणांवर उपचार सुरू असून, १९६ वर मृत्यूची संख्या स्थिर आहे.
जनावरांची बेकायदेशीर वाहतूक; एक ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील रिंगरोडकडे टेम्पोतून जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एकास गावभाग पोलिसांनी ताब्यात घेतले. अरुण अनिल गोसावी (वय २७, रा. बिरदेवनगर, रेंदाळ, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून टेम्पो व जनावरे असा एक लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुरुवारी दुपारी अरुण हा छोटा हत्ती (एमएच ०८ एच ७१३६) मधून तीन जनावरे बेकायदेशीरित्या घेऊन जात होता.