इचलकरंजीत 'माझा प्रभाग माझी जबाबदारी' नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:16 AM2021-06-19T04:16:26+5:302021-06-19T04:16:26+5:30

अतुल आंबी इचलकरंजी : संकटाच्या काळात लोकप्रतिनिधींनी मदत करावी ही नागरिकांची अपेक्षा असते. मात्र, कोरोनाच्या संकटकालीन परिस्थितीत काही ...

In Ichalkaranji, it is called 'My Ward, My Responsibility' | इचलकरंजीत 'माझा प्रभाग माझी जबाबदारी' नावालाच

इचलकरंजीत 'माझा प्रभाग माझी जबाबदारी' नावालाच

Next

अतुल आंबी

इचलकरंजी : संकटाच्या काळात लोकप्रतिनिधींनी मदत करावी ही नागरिकांची अपेक्षा असते. मात्र, कोरोनाच्या संकटकालीन परिस्थितीत काही मोजके नगरसेवक सोडले तर अनेकांनी नागरिकांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र इचलकरंजीत पाहायला मिळाले. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेली माझा प्रभाग माझी जबाबदारी ही मोहीम नुसती नावालाच होती का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. शहरात काही मोजकेच नगरसेवक कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत सक्रिय राहिले. काहींनी जुजबी मदत केली, तर काहीजण नामानिराळेच राहिले. शहरात कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर प्रभाग समितीच्या माध्यमातून नगरसेवक सक्रिय होते. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली, तसे काहीजण जपूनच सहभागी होत राहिले. दुसऱ्या लाटेत नागरिकांना बेड मिळणे मुश्कील बनले. अनेकांना त्रास सुरू झाल्यानंतर सुरुवातीला कोठे जायचे? काय करायचे माहिती नसल्यामुळे समजत नव्हते. रुग्णांना खासगी वाहनातून घेऊन वेगवेगळ्या कोविड केंद्रांवर फिरावे लागत होते. अशा काळात

शहरातील काही बोटांवर मोजण्याइतपत नगरसेवकांनीच हेल्पलाइन नंबर सुरू केले. काही नगरसेवकांनी नागरिकांनी स्वत:हून संपर्क साधल्यानंतर मदत करण्यास तत्परता दाखविली. विशेष म्हणजे शहरातील काही सामाजिक संस्थांनी हेल्पलाइन सेवा सुरू केली होती. माहेश्वरी युथ फाउंडेशन, इनाम कोरोना हेल्पलाइन, आवाडे समर्थक, बीजेपी आपदा सेवा कक्ष, आदींसह मैत्री फाउंडेशनसारख्या काही समाजसेवी संघटनांनी आॅक्सिजन मशिन व इतर साहित्य उपलब्ध करून देणे अशा सेवा केल्या. त्यामुळे अनेक नागरिकांना दिलासा मिळाला. योग्य माहिती मिळाल्याने वेळेत रुग्ण दाखल होऊन उपचार सुरू झाले. असे कार्य नगरसेवकांकडून अपेक्षित होते. परंतु त्याला काही मोजक्याच नगरसेवकांनी प्रतिसाद दिला.

चौकट :

शहरातील ध्रुवती दळवाई या नगरसेविकेने पती सदानंद दळवाई यांच्या माध्यमातून प्रभागासाठी स्व:खर्चाने कोविड केंद्र सुरू केले.

काहींचे शासनाच्या लसीवर राजकारण

काही नगरसेवकांनी लसीकरण मोहिमेला हातभार लावण्याच्या नावाखाली स्वतंत्र केंद्र सुरू केले. त्यामध्ये ठराविक नगरसेवकांनी चांगल्या पद्धतीने केंद्र चालवून प्रशासनाला सहकार्य केले. तर काहींनी आपल्या बगलबच्चांना व वशिलाबाजांना बोलवून लस दिली. अधिक लस मिळविण्यासाठी प्रशासनासोबत वादही घातले.

काहींची सक्रिय यंत्रणा

काही मोजक्या नगरसेवकांनी आपल्या प्रभागात भाजीपाला, दूध, दळण, किराणा व जीवनावश्यक साहित्यांचे घरपोच नियोजन लावले. प्रभागातील लसीकरणसंदर्भात यादी तयार करून नियमानुसार लसीकरण करून घेतले.

कोट :

आपत्कालीन परिस्थितीत सहकार्य न करणाऱ्यांचा हिशेब नागरिकांनी चुकता करावा.

शीतल मगदूम, इनाम, इचलकरंजी.

Web Title: In Ichalkaranji, it is called 'My Ward, My Responsibility'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.