इचलकरंजीत जैन समाजाच्यावतीने मोफत अन्नछत्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:21 AM2021-04-26T04:21:39+5:302021-04-26T04:21:39+5:30
इचलकरंजी : सकल जैन समाजाने भगवान महावीर जयंतीनिमित्त रविवारपासून बालाजी चौक विक्रमनगर येथे मोफत अन्नछत्र सुरू केले आहे. ...
इचलकरंजी : सकल जैन समाजाने भगवान महावीर जयंतीनिमित्त रविवारपासून बालाजी चौक विक्रमनगर येथे मोफत अन्नछत्र सुरू केले आहे. लॉकडाऊनपर्यंत हे मोफत अन्नछत्र सुरू राहणार आहे, अशी माहिती भगवान महावीर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. रविवारी प्रत्येक मंदिरात फक्त पंडित वर्गाच्या उपस्थितीत सकाळी जन्माभिषेक व विविध धार्मिक सोहळा पार पडला.
जयंतीनिमित्त वीर सेवादल शहापूरच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. त्याचे उद्घाटन मान्यवरांनी केले. कार्यक्रमास गुंडाप्पाण्णा रोजे, उदय चौगुले, संजय मगदूम, दिलीप वणकुद्रे, मोहन चौगुले, विजय गिरमल, अभय पाटील, अभय बाबेल, मयूर पिपाडा, आदी उपस्थित होते.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जैन समाजाने प्रत्येकांनी घरीच भगवान महावीर जयंती साजरी करावी, असे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देऊन अनेक घरांमध्ये कुटुंब मर्यादित विधिवत पूजा केली.
फोटो ओळी
२५०४२०२१-आयसीएच-०३
इचलकरंजीत सकल जैन समाजाने भगवान महावीर जयंतीनिमित्त मोफत अन्नछत्र सुरू केले आहे.