इचलकरंजीत मोफत अन्नछत्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:24 AM2021-04-25T04:24:44+5:302021-04-25T04:24:44+5:30
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून कडक निर्बंध लागू केले आहेत. या काळात ...
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून कडक निर्बंध लागू केले आहेत. या काळात अत्यावश्यक सेवांखेरीज अन्य व्यवसाय, उद्योग बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब, कष्टकरी कामगार, मजूर, निराधार, बेघरांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे, तसेच अनेकदा उपासमारही होत आहे. अशावेळी व्हिजन इचलकरंजी संस्थेकडून गोरगरीब व निराधार नागरिकांसाठी गुरुवारपासून मोफत अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे. व्हिजन इचलकरंजी या संस्थेने यापूर्वी 2019 च्या महापुरावेळी एक महिना 400 लोकांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली होती. गतवर्षी कोरोना महामारीमध्ये गरिबांना शिधा वाटप केला, तर गेल्या 5 वर्षांपासून ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमातून गरिबांना वापरायोग्य कपडे उपलब्ध करून दिले आहेत.