इचलकरंजीत मंगळागौर खेळ, सखी महोत्सव उत्साहात

By admin | Published: October 7, 2015 12:22 AM2015-10-07T00:22:05+5:302015-10-08T00:57:57+5:30

सखी महोत्सवामुळे इचलकरंजी सदस्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. रोटरी क्लबच्या प्रांगणात झालेला हा कार्यक्रम अक्षरश: अडीच तास चालला होता.

Ichalkaranji Mangalgaur Games, Sakhi Festival | इचलकरंजीत मंगळागौर खेळ, सखी महोत्सव उत्साहात

इचलकरंजीत मंगळागौर खेळ, सखी महोत्सव उत्साहात

Next

इचलकरंजी : महिलांचे झिम्मा-फुगडी, मंगळागौरीचे खेळ आणि ‘लोकमत’ सखी मंच आयोजित सखी महोत्सवामुळे इचलकरंजी सदस्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. रोटरी क्लबच्या प्रांगणात झालेला हा कार्यक्रम अक्षरश: अडीच तास चालला होता.
‘लोकमत’ सखी मंचच्यावतीने खास इचलकरंजी सदस्यांसाठी ‘सखी महोत्सव २०१५’चे आयोजन केले होते. प्रारंभी ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन शुभलक्ष्मी देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. थाळी सजावट, विनोदी उखाणे आणि विविध प्रकारच्या मोदक स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शुभलक्ष्मी देसाई यांनी काम पाहिले. स्पर्धेतील विजेत्यांचा निकाल पुढीलप्रमाणे : थाळी सजावट - नीलम हुल्ले (प्रथम), ज्योती काजवे (द्वितीय), सुप्रिया मजले (तृतीय), विद्या शिंदे व सोनिया पाटील (उत्तेजनार्थ). विनोदी उखाणे - छाया चिंचवाडे (प्रथम), नूतन बोरा (द्वितीय), शीला घाटगे (तृतीय), नमिता कोळेकर व नेहा कापसे (उत्तेजनार्थ). मोदक स्पर्धा - अनुराधा पाटील (प्रथम), अंजली कुबडे (द्वितीय), प्रणोती दुधाणे (तृतीय), दीपाली पाटील व शबनम तांबोळी (उत्तेजनार्थ). याचवेळी सखी सदस्यांचा लकी ड्रॉ काढण्यात आला. या कार्यक्रमाच्या विजेत्या रोहिणी अमित घाटगे या ठरल्या.
उगार महिला सांस्कृतिक मंडळाच्या सदस्यांनी झिम्मा-फुगडी, काटवट कणा, घोडा-घोडा, छुई-फुई, मंगळा गौर, आदी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. सुमारे ४० मिनिटे चाललेली प्रात्यक्षिके पाहण्यात सखी सदस्या गुंग झाल्या. सूत्रसंचालन सखी संयोजिता प्रियांका नरुटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्नेहल घाटगे, वैशाली डोंगरे, बिना कारेकर, स्मिता मुथा, भारती सूरपुरिया, डॉ. नीलम वाडकर, संगीता गजरे व रागिनी यादव यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Ichalkaranji Mangalgaur Games, Sakhi Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.