इचलकरंजी पालिकेची सभा ‌ठरली वादळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:18 AM2021-07-01T04:18:22+5:302021-07-01T04:18:22+5:30

नगरसेवकांचा आरोप आरोप-प्रत्यारोपांमुळे गोंधळ लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहापूर येथील सीईटीपी प्रकल्प, सारण गटारीची साफसफाई, नगरपालिका शाळेतील मुलांना ...

Ichalkaranji Municipal Corporation meeting was stormy | इचलकरंजी पालिकेची सभा ‌ठरली वादळी

इचलकरंजी पालिकेची सभा ‌ठरली वादळी

googlenewsNext

नगरसेवकांचा आरोप

आरोप-प्रत्यारोपांमुळे गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहापूर येथील सीईटीपी प्रकल्प, सारण गटारीची साफसफाई, नगरपालिका शाळेतील मुलांना साहित्य वाटप, जागेवरील आरक्षण, शहीद भगतसिंग उद्यानातील बुलेट ट्रेन, जलशुद्धीकरण केंद्राजवळील कापड विक्रीची गाळे, ठेकेदारांच्या कामांना देण्यात येणारी मुदतवाढ या विषयावरून सर्वसाधारण सभेत बुधवारी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यातील अनेक कामे ही बोगस असून, पालिकेला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याची टीका काही नगरसेवकांनी केली.

श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात आयोजित सर्वसाधारण सभा झाली.

अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अलका स्वामी होत्या. सभेच्या सुरूवातीस नगरसेविका सायली लायकर यांनी लक्षवेधीमध्ये कोरोना प्रादुर्भावामुळे शहरात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापने बंद ठेवली आहेत. त्यामुळे व्यापाºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पालिकेने लवकर दुकाने सुरू करण्याची मागणी केली. बिग बाजारजवळ गटारी तुंबत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारी करण्यात आल्या नाहीत. सदरचे काम त्वरित करावे, अशी मागणी नगरसेवक इकबाल कलावंत व रवींद्र माने यांनी केली. येत्या सोमवारपर्यंत यावर ठोस निर्णय न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा कलावंत यांनी दिला.

सध्या शहरात गॅस पाईपलाईन जोडण्यासाठी खुदाई करताना पाण्याची पाईपलाईन तोडली जाते. तसेच खुदाई करताना नकाशा न घेताच काम सुरू असते. अशा प्रकारामुळे शहराचे वाटोळे होईल, असा आरोप पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे व सुनील पाटील यांनी केला. ताराराणीचे पक्षप्रतोद प्रकाश मोरबाळे यांनी कायद्याने दर महिन्याला सभा घेण्याचे बंधनकारक आहे.

मात्र, २८ फेब्रुवारी २०२१ नंतर तब्बल चार महिन्यांनंतर ही सभा घेण्यात आली. यामुळे नगरपालिकेच्या विकासामध्ये अडथळा निर्माण होत असल्याचे मत मांडले. नगरसेवक बावचकर यांनी ऐनवेळच्या विषयांमध्ये ५ पैकी ३ विषय आर्थिक धोरणाचे आहेत. त्यामुळे ते रद्द करण्याची मागणी केली. त्यानुसार ते तीन विषय रद्द केले.

चौकटी

भगतसिंग उद्यानातील रेल्वे गेली कुठे?

दोन वर्षांपूर्वी भगतसिंग उद्यानात सुमारे एक कोटी २२ लाख रुपये खर्च करून विकासकामे केली होती. त्यातील रेल्वे काही दिवसातच बंद पडली. त्यानंतर आता पुन्हा नव्याने प्रस्ताव आणल्याने जुन्या रेल्वेचे काय झाले, असा सवाल बावचकर यांनी केला.

सीईटीपी प्रकल्पाला विरोध

शहापूर परिसरात प्रस्तावित असलेल्या सीईटीपी प्रकल्पाला परिसरातील नगरसेवकांनी विरोध केला. परंतु १५ विरुद्ध १८ मताने तो विषय मंजूर करण्यात आला, तर दोन सदस्य तटस्थ राहिले.

Web Title: Ichalkaranji Municipal Corporation meeting was stormy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.