इचलकरंजीत अधिकाऱ्यांची धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:26 AM2021-05-26T04:26:09+5:302021-05-26T04:26:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरातील वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून प्रांताधिकारी, मुख्याधिकारी, अपर तहसीलदार व पोलीस ...

Ichalkaranji officers crack down | इचलकरंजीत अधिकाऱ्यांची धडक कारवाई

इचलकरंजीत अधिकाऱ्यांची धडक कारवाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहरातील वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून प्रांताधिकारी, मुख्याधिकारी, अपर तहसीलदार व पोलीस उपअधीक्षक यांनी एकत्र येत मंगळवारी संयुक्तपणे मुख्य मार्गावर कारवाईची मोहीम राबवली. या कारवाईत दिवसभरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व विनामास्क फिरणाऱ्यांकडून ३१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आणि १ स्टॅम्पव्हेंडरचे दुकानही सील केले.

लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करूनही शहर व परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. त्यासाठी कडक धोरण राबविण्याचे इचलकरंजीतील स्थानिक प्रशासनाने संयुक्त बैठकीत जाहीर केले आहे. त्या पार्श्ववभूमीवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा निर्णय घेतला.

मंगळवारी सकाळी गांधी पुतळ्याजवळ प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, अपर तहसीलदार शरद पाटील, मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल, सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्यासह अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले. यावेळी रस्त्यावर नागरिकांची वर्दळ व दुकानांमध्ये गर्दी दिसत होती. अनेक जण बेफिकीर मास्क न वापरता फिरत होते. अचानक अधिकाऱ्यांचे पथक कारवाई करू लागल्याने मुख्य मार्गावर नागरिकांची पळापळ सुरू झाली. यावेळी दुकानदारांची चांगलीच दमछाक झाली होती. प्रशासनाने दिवसभरात विनामास्क फिरणाऱ्यांकडून आठ हजार रुपये, नियम न पाळणाऱ्या राजाराम स्टेडियम परिसरातील स्टॅम्पव्हेंडरचे दुकान सील केले, तर अन्य १९ दुकानदारांकडून २३ हजार रुपये दंड वसूल केला आहे.

फोटो ओळी

२५०५२०२१-आयसीएच-०२

इचलकरंजीत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी स्टॅम्पव्हेंडरचे दुकान सील केले.

Web Title: Ichalkaranji officers crack down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.